Bori Bridge : एकाही घराला धक्का लागणार नाही : पर्यावरणमंत्री

Bori Bridge : बोरी पूल बांधण्यासाठी पूर्ण पाठिंबा
Alex Sequeira
Alex SequeiraDainik Gomantak

Bori Bridge :

सासष्टी, मडगाव व फोंडा रस्त्यावरील वाढलेली वाहतूक पाहता बोरी पुलाची आवश्यकता आहेच; पण हा पूल बांधताना एकाही घराला धोका पोहोचणार नाही याची खबरदारी घेऊनच तो बांधण्यासाठी आपला पाठिंबा असेल, असे पर्यावरणमंत्री व नुवेचे आमदार आलेक्स सिक्वेरा यांनी शनिवारी (ता.१५) पत्रकारांना वेर्णा येथील कार्यक्रमादरम्यान सांगितले.

प्रस्तावित बोरी पूल हा खांबांवरून बांधला जाणार असल्याने घरांना व शेतजमिनीला धोका नाही. या पुलावर जाण्यासाठी जो रस्ता तयार केला जाईल तोसुद्धा खांबांवरूनच बांधला जाईल. आपण यापूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना संबंधित पंचायत, शेतकऱ्यांशी संपर्क साधून त्यांचे म्हणणे ऐकून घ्यायला सांगितले आहे, असेही मंत्री सिक्वेरा यांनी सांगितले.

Alex Sequeira
Goa Assembly Monsoon Session 2024: लोकसभा निकालानंतर पहिले अधिवेशन, कोणते मुद्दे गाजणार?

शेतीसाठीच्या मदतीत राजकारण नाही

सिक्वेरा यांनी आज नुवे मतदारसंघात शेतकऱ्यांना खतांचे वाटप केले. दरवर्षी आपण शेतकऱ्यांना खताबरोबच शेतीसाठी लागणारी इतर मदतही उपलब्ध करून देतो. यंदाही तेच करत आहे. त्यात नवीन असे काहीच नाही. त्‍यात राजकारण कोठेच नाही, असे ते म्‍हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com