Bonderam Festival
Goa Bonderam Festival Dainik Gomantak

Bonderam Festival: गोव्यातील पारंपारिक ध्वज महोत्सव! दिवाडी बेटावरचा 'बोन्देरा'

Bonderam Festival Goa: गेल्या शनिवारी, 16 ऑगस्ट रोजी सांव मॅथियास (दिवाडी बेट) येथील सेंट मॅथियास स्पोर्ट्स क्लबने त्यांचं वार्षिक बोन्देरा महोत्सव उत्साहाने साजरा केला.
Published on

गेल्या शनिवारी, 16 ऑगस्ट रोजी सांव मॅथियास (दिवाडी बेट) येथील सेंट मॅथियास स्पोर्ट्स क्लबने त्यांचं वार्षिक बोन्देरा महोत्सव उत्साहाने साजरा केला.

या महोत्सवाच्या निमित्ताने गावात सकाळी 11 ते रात्री 10 वाजेपर्यंत वेगवेगळ्या कार्यक्रमांची रेलचेल होती. हा बोंदेरा महोत्सव गोव्याचा सर्वात जुना पारंपारिक ध्वज महोत्सव मानला जातो. 

 Bonderam Festival
Bonderam: 'दिवाडी बेट' सजले! ‘बोंदेरा’ उत्साहात साजरा; सामुदायिक एकतेचे आणि सांस्कृतिक वैभवाचे दर्शन

या महोत्सवाच्या निमित्ताने गावात वेगवेगळ्या कार्यशाळा, व्याख्याने, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची सादरीकरणे, पथनाट्य, स्थानिक ब्रास बँडचे सादरीकरण, मिठाई वाटप, ध्वजफेरी, चित्ररथ असे वेगवेगळे कार्यक्रम सादर झाले. मळार मधील बोन्देरा महोत्सव, सांस्कृतिक समावेशकता आणि समुदायाच्या सहभागासाठी ओळखला जातो. गोव्याच्या पर्यटन विभागाचे या कार्यक्रमाला सहकार्य असते.

 Bonderam Festival
या विकेंडला काहीतरी खास करा; गोव्यातील हटके बोंदेरा उत्सवाचा आनंद घ्या, जाणून घ्या वेळापत्रक

16 ऑगस्ट रोजी झालेला हा बोन्देरा महोत्सव दिवाडी बेटावरच्या मळार या भागातील होता तर आज, 23 ऑगस्ट रोजी या गावातील बोन्देरा महोत्सवाचा दुसरा भाग पिएदाद या भागात साजरा होणार आहे. पिएदाद महोत्सव मात्र अधिक समकालीन कार्निवल वातावरण तयार करतो. या दिवशी देखील दिवाडी बेटावर तुडुंब गर्दी उसळलेली असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com