Bombay High Court: गोव्यातील पाच वकिलांची उच्च न्यायालयात नेमणूक

Senior Lawyers: नेमणुकीचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल आर. एन. जोशी यांनी काढला आहे
Senior Lawyers: नेमणुकीचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल आर. एन. जोशी यांनी काढला आहे
Senior Lawyers GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: मुंबई उच्च न्यायालयाने २४ वकिलांची वरिष्ठ वकील म्हणून नेमणूक केली आहे. त्यामध्ये गोव्यातील विद्यमान ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांच्यासह पाच वकिलांचा समावेश आहे. हा नेमणुकीचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल आर. एन. जोशी यांनी काढला आहे.

गोव्यातील ज्या वकिलांची वरिष्ठ वकील म्हणून नेमणूक झाली आहे त्यामध्ये ॲड. देविदास पांगम, ॲड. कार्लोस फेरेरा, ॲड. क्लिओफात कुतिन्हो, संदेश पडियार व नॉर्मा आल्वारिस यांचा समावेश आहे. ॲड. देविदास पांगम हे गेल्या पाच वर्षापासून ॲडव्होकेट जनरल म्हणून काम पाहत आहेत.

ॲड. कार्लोस फेरेरा हे सध्या हळदोण्याचे आमदार आहेत. ॲड. क्लिओफात कुतिन्हो हे कायदा तज्ज्ञ म्हणून परिचित आहेत. ॲड. संदेश पडियार यांनी गेली अनेक वर्षे उच्च न्यायालयात वकील म्हणून काम पाहत आहे. ॲड. नॉर्मा आल्वारिस यांनी गोवा फाऊंडेशनतर्फे दाखल असलेल्या पर्यावरण संबंधित प्रकरणामध्ये उच्च न्यायालयात बाजू मांडल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

 Devanand Naik Press Conference
Goa High Court POCSO ruling
Bombay High Court Goa Bench Panchayat Documents Order
Crimes Against Minors Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com