मडगाव: बोलशे सर्कलजवळ असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेच्या बाजूला मोठ्या प्रमाणावर कचरा साठून राहिलेला असून हा कचरा तिथेच पडून असल्याने सगळीकडे दुर्गंधी पसरली आहे. या संबंधी मडगाव पालिकेकडे संपर्क साधूनही हा कचरा उचलला गेलेला नाही अशी तक्रार स्थानिकांनी केली आहे.
बोलशे सर्कलजवळचा हा भाग गजबजलेली लोकवस्ती असून तिथे मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक आस्थापनेही आहेत. त्यामुळे या भागात जमणारा कचराही जास्त असतो. हा कचरा उचलण्यास कित्येकवेळा मडगाव पालिकेकडून दिरंगाई होत असते. त्यामुळे स्थानिकांना दुर्गंधीला सामोरे जावे लागते.
येथील स्थानिकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, ही दुर्गंधी असह्य झाल्याने कित्येकांनी आता बँकेत जाणेही बंद केले आहे. या भागात असलेल्या अपार्टमेन्टसमध्ये जे लोक रहातात त्यांनाही नाक मुठीत धरुन रस्ता ओलांडावा लागतो. या भागात लोकांच्या मनोरंजनासाठी एक बुद्धाचा पुतळा बसविण्यात आला होता. आणि हा पुतळा पहाण्यासाठी बरेच लोक येत होते. मात्र, हा कचरा या ठिकाणी वाढल्यानंतर बरेच येणे बंद झाले आहे, अशी माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.