बुडालेल्या शिक्षकाचा मृतदेह सापडला

Ravindra Pagi
Ravindra Pagi
Published on: 
Updated on: 

आगोंद
आज संध्याकाळी कुड्डी, खोला येथील काही युवक काब - द - राम, खोला येथील समुद्र किनाऱ्यावर गळ टाकून मासेमारीसाठी गेले असता बुडाल्यानंतर बेपत्ता झालेल्या युवकाचा मृतदेह दिसल्यानंतर याची कल्पना स्थानिकांना देण्यात आली. साळेरी, खोला येथील एक शिक्षक आगोंद समुद्रात रविवारी (ता. १९) बुडाला होता. सरकारी यंत्रणेने त्याचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला, पण यश आले नाही.
साळेरी येथील रवींद्र ऊर्फ सावन रवींद्र पागी (४३) हा अविवाहित शिक्षक काणकोण मास्तीमळ येथील सरकारी औद्योगिक प्रशिक्षण विद्यालयात शिक्षक म्हणून गेली काही वर्षे विद्यादान करत असे. रविवार १९ रोजी दुपारी जाळे टाकून मासे पकडायला, रामाचे भुशीर साळेरी नदीच्या मुखपात्राच्या ठिकाणी ते गेले असावे व घसरून समुद्रात बुडण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती.
काणकोण पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच सर्वत्र शोधाशोध केली. पागी यांची दुचाकी चावीसह व चपल त्याच दिवशी सापडले होते. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दोन हेलिकॉप्टर, नौदल, किनारी पोलिस, काणकोण पोलिस या सर्वांनी शोध मोहिमेत भाग घेतला होता. यावेळी काणकोण मामलेदार विनोद दलाल, उपजिल्हाधिकारी सतीश प्रभू आदी जातीने घटनास्थळी उपस्थित राहून शोध मोहिमेवर लक्ष ठेवून होते. गेले पाच दिवस साळेरीवासीयांनी या मृतदेहाचा शोध लावण्याकरता शक्य ते सर्व केले होते. मात्र, संध्याकाळी उशिरा ही दुखद बातमी गावात पोहचली.

संपादन - यशवंत पाटील

 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.