Agarvada Accident: चालकाचा ताबा सुटून दुचाकीला दिली धडक; भरधाव टेम्पोखाली येऊन एक ठार, दुसरा गंभीर

Goa Agarvada Accident: मालवाहतूक टेम्‍पो (जीए ०८ व्ही ४९९८) हा भरधाव वेगाने आगरवाड्याच्‍या दिशेने येत होता. चालक रत्नाकर दत्ताराम नाईक (सांकवाळ-वास्‍को) याचा वाहनावरील ताबा सुटला आणि त्‍याने विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला (एमएच ०७ के एके ९२०६) जोरदार धडक दिली.
Goa Agarwada Accident: मालवाहतूक टेम्‍पो (जीए ०८ व्ही ४९९८) हा भरधाव वेगाने आगरवाड्याच्‍या दिशेने येत होता. चालक रत्नाकर दत्ताराम नाईक (सांकवाळ-वास्‍को) याचा वाहनावरील ताबा सुटला आणि त्‍याने विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला (एमएच ०७ के एके ९२०६) जोरदार धडक दिली.
Agarvada Tempo AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी: बोडकोधेनू-आगरवाडा येथे आज सोमवारी सकाळी टेम्‍पो व दुचाकी या दोन वाहनांमध्‍ये झालेल्‍या भीषण अपघातात रामकृष्ण प्रदीप निखार्गे (२९,आजगाव-सिंधुदुर्ग) याचा मृत्‍यू झाला तर गणपत रमाकांत केरकर (२७, तिरोडा-सिंधुदुर्ग) हा गंभीर जखमी झाला आहे. गणपत हा दुचाकी चालवत होता तर रामकृष्‍ण त्‍याच्‍यामागे बसला होता.

मिळालेल्‍या माहितीनुसार, मालवाहतूक टेम्‍पो (जीए ०८ व्ही ४९९८) हा भरधाव वेगाने आगरवाड्याच्‍या दिशेने येत होता. चालक रत्नाकर दत्ताराम नाईक (सांकवाळ-वास्‍को) याचा वाहनावरील ताबा सुटला आणि त्‍याने विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला (एमएच ०७ के एके ९२०६) जोरदार धडक दिली.

Goa Agarwada Accident: मालवाहतूक टेम्‍पो (जीए ०८ व्ही ४९९८) हा भरधाव वेगाने आगरवाड्याच्‍या दिशेने येत होता. चालक रत्नाकर दत्ताराम नाईक (सांकवाळ-वास्‍को) याचा वाहनावरील ताबा सुटला आणि त्‍याने विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला (एमएच ०७ के एके ९२०६) जोरदार धडक दिली.
Dharbandora Accident: अपघातामुळे अपंगत्व आलेल्या व्यक्तीला कोर्टाचा दिलासा! धारबांदोड्यातील महिलेला मिळणार भरपाई

या अपघातात दुचाकीच्‍या मागे बसलेला व बेसावध असलेला रामकृष्ण निखार्गे हा रस्‍त्‍यावर पडला व टेम्‍पोच्‍या चाकाखाली सापडला. गंभीर अवस्‍थेत त्‍याला उपचारांसाठी इस्‍पितळात दाखल केले असता डॉक्‍टरांनी मृत घोषित केले. तर, दुचाकीस्‍वार गणपत केरकर हा गंभीर जखमी झाला असून, त्‍याच्यावर म्‍हापसा येथील आझिलो इस्‍पितळात उपचार सुरू आहेत.‍माहिती मिळताच मांद्रे पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेऊन पंचनामा केला. अधिक तपास सुरू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com