Bodgeshwar Jatra: जत्रा संपली; शेतजमीन प्लास्टिक कचऱ्याने भरली!

यंदाही येरे माझ्या मागल्याच! : व्यापारी परतले; पालिका कर्मचाऱ्यांकडून साफसफाईस सुरुवात
Bodgeshwar Jatra
Bodgeshwar JatraDainik Gomantak

Bodgeshwar Jatra: जत्रा संपली आणि व्यापारी वर्गांनी कचरा येथेच टाकून परतीच्या प्रवासाला निघून गेले, अशी स्थिती मंगळवारी म्हापसा शहरात पाहायला मिळाली. श्री देव बोडगेश्वर मंदिराच्या भव्य पटांगणावर बारा दिवसांची ही जत्रा संपल्यानंतर संपूर्ण मैदान हे प्लास्टिक कचऱ्याने भरून गेलेले दिसत आहे.

हा कचरा साफ करण्याचे काम नंतर पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून हाती घेण्यात आले. म्हापशातील सुप्रसिद्ध अशा श्री बोडगेश्वर देवस्थानची जत्रा अखेर सोमवारी संपुष्टात आली. खाद्यपदार्थ आणि मनोरंजनाच्या खेळातून कोटींची उलाढाल या जत्रेच्या माध्यमातून झाली. मात्र, ही जत्रा संपताच दरवर्षी या ठिकाणी प्लास्टिक कचरा विखुरलेला पाहायला मिळतो.

यंदाही हीच परिस्थिती जत्रोत्सव संपल्यानंतर दिसली. काही बेशिस्त व्यापारी आपल्या दुकानातील कचरा जातेवेळी तिथेच टाकून माघारी परतले. यामध्ये मोबाईल्स व प्लास्टिक कव्हरचा मोठ्या प्रमाणात खच दिसला.

याशिवाय प्लास्टिक पिशव्या या शेतजमिनीवर सर्वत्र विखुरल्या होत्या. तर काही ठिकाणी गोबी मंचुरियन तसेच कॉर्न टाकण्यात आले होते. ज्यावर भटकी गुरे ताव मारत होती.

Bodgeshwar Jatra
Goa News: खिंड-मोरजी विकास प्रकल्पात दारुच्या बाटल्यांचा झाला खच

टाकतोय कोण; भरतोय कोण?

बारा दिवसांनंतर सोमवारी ही जत्रा संपुष्टात आली. सोमवारी सकाळपासून जत्रेच्या फेरीतील व्यापारी व दुकानदारांना जागा खाली करण्यास सांगितले. त्यानुसार, सायंकाळपर्यंत अनेकांनी दुकाने हटविली.

याशिवाय मंगळवारी स्टॉल्सवाले टेम्पो व रिक्षांमधून आपले साहित्य घालून माघारी जाताना दिसले. मात्र, जातेवेळी अनेकांनी आपल्या आस्थापनातील कचरा तसेच प्लास्टिक तिथेच फेकून गेले. हा कचरा नंतर म्हापसा पालिकेकडून साफ केला जात होता.

Bodgeshwar Jatra
Ferry Boat: चोडण-रायबंदर फेरीबोट सेवा विस्कळीत; नियमित प्रवाशांचे अतोनात हाल

11.15 लाख सोपो वसूल...

यंदा बोडगेश्वर जत्रोत्सवात एक हजारपेक्षा जास्त तात्पुरते स्टॉल्स (दुकाने) थाटले होते. या दुकानदारांकडून म्हापसा पालिकेने सोपो म्हणून 11 लाख 15 हजार रुपये शुल्क वसूल केले, अशी माहिती म्हापसा पालिका नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकरांनी दिली. पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच या जत्रेतून इतका मोठा महसूल जमा झाला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com