गोवा डेअरीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु

पाचव्या दिवशी एकूण 36 उमेदवारी अर्ज; निवडणूक येत्या 19 जूनला
Goa Dairy
Goa DairyDainik Gomantak

फोंडा : गोवा डेअरीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवारी दाखल करण्याच्या सहाव्या दिवशी एकूण 36 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. 12 जागांसाठी ही निवडणूक होत असून उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस सोमवारी 30 आहे. गोवा डेअरीच्या संचालक मंडळाच्या निवडीसाठी येत्या 19 जूनला मतदान होणार असून 20 रोजी मतमोजणी होणार आहे.

गोवा डेअरीच्या 2017 मध्ये निवडून आलेल्या संचालक मंडळापैकी काहीजणांना अपात्र ठरवण्याच्या प्रकारामुळे 6 सप्टेंबर 2018 पासून सरकारनियुक्त प्रशासकाकडून गोवा डेअरीचा कारभार हाताळला जात आहे. गेल्या साडेचार वर्षांच्या या कार्यकाळात फक्त मध्यंतरी 2019 मध्ये केवळ चार महिन्यांसाठी राजेश फळदेसाई यांची अध्यक्षपदी निवड झाली होती, पण नंतर येरे माझ्या मागल्या प्रकार सुरू झाला तो आता नवीन संचालक मंडळाच्या निवडीनंतर संपणार आहे.
राज्यातील 173 दूध सोसायट्यांमधील बारा संचालक निवडीबरोबरच सरकारनियुक्त तीन संचालक मिळून एकूण पंधरा संचालक मंडळ गोवा डेअरीवर कार्यरत असते. आता होणाऱ्या निवडणुकीसाठी 173 सोसायट्यांचे अध्यक्ष मतदान करणार असून 12 संचालकांची निवड करण्यात येणार आहे.

Goa Dairy
Top 5 Goa News | गोंयच्यो 5 मुखेल खबरो

गोवा डेअरीवर सर्वांत जास्त काळ प्रशासकांचा

गोवा डेअरीच्या पन्नास वर्षपूर्तीच्या कार्यकाळात आतापर्यंत सर्वांत जास्त प्रशासकांची सद्दी ही मागच्या 2017 च्या निवडणुकीनंतरच सुरू झाली आहे. आतापर्यंत सहा प्रशासकांनी गेल्या चार वर्षांत कार्यकाळ सांभाळला आहे. निवडून आलेल्या संचालक मंडळाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे प्रशासकांची नियुक्ती सरकारने केली ती आता नवीन संचालक मंडळ निवडीपर्यंत राहणार आहे.

गोवा डेअरीच्या बारा संचालकांच्या निवडणुकीसाठी आतापर्यंत 36 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. उमेदवारी दाखल करण्याचा सोमवार हा शेवटचा दिवस असल्याने उमेदवारी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. उमेदवारी अर्जांची छाननी येत्या मंगळवारी करण्यात येणार आहे. दरम्यान, विद्यमान संचालक मंडळांचा गेल्या पाच वर्षांचा कार्यकाळ वादग्रस्त ठरला. तर गेल्या दहा वर्षांत गोवा डेअरीच्या प्रशासकीय कामकाज व भ्रष्टाचाराचा मुद्दा, बेकायदा नोकर भरती तसेच व्यवस्थापकीय संचालकांवरूनही गोवा डेअरी कायम प्रकाशझोतात राहिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com