Goa Road: भूसंपादनाच्या समस्यांमुळे ब्लॅकस्पॉट दुरुस्तीच्या कामात अडथळे; PWD मंत्री नीलेश काब्राल

भूसंपादनातील अडचणींमुळे अपघातप्रवण ब्लॅक स्पॉट्स दूर करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना अडथळे येत आहेत
Nilesh Cabral
Nilesh Cabral Dainik Gomantak

गोवा: भूसंपादनातील अडचणींमुळे अपघातप्रवण ब्लॅक स्पॉट्स दूर करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना अडथळे येत आहेत, असा दावा सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांनी केला आहे. रस्त्यासंबंधित कामे करता यावीत यासाठी जनतेने आपली जमीन मोकळी ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.

(Blackspot rectifying work hampered due to land acquisition issues PWD Minister nilesh cabral)

Nilesh Cabral
Goa Politics: कुंकळ्ळीचे नगरसेवक उद्देश नाईक देसाई यांची गोवा फॉरवर्डमधून हकालपट्टी!

एकूण 27 ब्लॅक स्पॉट्सपैकी 12 भूसंपादन समस्यांमुळे विलंब होत आहेत, असे ते म्हणाले. राज्याच्या रस्त्यांवरील 17 ब्लॅक स्पॉट्स पैकी 10 दुरुस्त करण्यात आले आहेत आणि 600 सुधारणा स्पॉट्सपैकी 168 दुरुस्त करण्यात आले आहेत

उर्वरित 4 ते 5 महिन्यांत काम पूर्ण केले जातील, असे काब्राल यांनी यावेळी बोलताना सांगितले. PWD मंत्र्यांनी पुढे निदर्शनास आणून दिले की राष्ट्रीय महामार्ग हे एकूण रस्त्यांच्या नेटवर्कपैकी 5% असले तरी सर्वाधिक अपघात राष्ट्रीय महामार्गांवर होतात.

30 सप्टेंबरपर्यंत 2244 अपघात, 179 जीवघेणे

यंदाच्या वर्षी 30 सप्टेंबरपर्यंत 2244 एवढे अपघात झाले. ज्यात जीवघेण्या 179 अपघातांत 179 जणांना मरण आले. याच 9 महिन्याच्या काळासाठी गतवर्षी 153 मृत्युमुखी पडले होते. यंदा त्यात 42 ने वाढ झाली. या वर्षी 3 लाख 87 हजार 629 जणांना चलन देण्यात आले. त्यातून 13 कोटी 46 लाख 11 हजार 300 रुपये दंड वसूल करण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com