Goa Politics: भाजपचे गोवा प्रभारी सी. टी. रवी गोव्यात आज विविध विभागाच्या बैठकांचे आयोजन

गोवा भाजपचे गोवा प्रभारी सी. टी. रवी आज गोव्यात दाखल झाले. उद्या विविध विभागाच्या बैठकांचे आयोजन केले असून सर्व भाजप आमदारांचीही बैठक होणार आहे.
C T Ravi
C T Ravi Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा भाजपचे गोवा प्रभारी सी. टी. रवी काल गोव्यात दाखल झाले. आज विविध विभागाच्या बैठकांचे आयोजन केले असून सर्व भाजप आमदारांचीही बैठक होणार आहे, अशी माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिली आहे.

(BJP's Goa in-charge C. T. Ravi Various departmental meetings organized in Goa today)

C T Ravi
Goa Politics: अपात्रता याचिकेवर सुनावणीचा सभापतींनी गमावला अधिकार; गिरीश चोडणकर

तानावडे म्हणाले, प्रभारी रवी संघटनात्मक बैठकांसाठी गोव्यात आले असून काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेल्या आमदारांसमवेत त्यांची पहिल्यांदाच चर्चा होईल. याशिवाय आमच्या नेहमीच्या संघटनात्मक बैठका होतील. यामध्ये नुकत्याच झालेल्या सेवा पंधरवडा समितीची बैठक होईल आणि आगामी कार्यक्रमांचे नियोजन जाहीर करण्यात येईल. यामध्ये अन्य राजकीय चर्चा अपेक्षित नाही. मात्र, काँग्रेसमधून नव्याने दाखल झालेल्या आमदारांसमवेत बैठक होईल.

कामत यांनी घेतली रवी यांची भेट

गोव्याचे भाजप प्रभारी संघटनात्मक बैठकांसाठी गोव्यात दाखल झाले आहेत. आज संध्याकाळी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेल्या दिगंबर कामत यांनी सी. टी. रवी यांची भेट घेऊन विविध मुद्यांवर चर्चा केल्याची माहिती आहे. या बैठकीतील तपशील समजू शकला नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com