गोवा लोकसभा निवडणूकीसाठी भाजपची 'धूर्त' खेळी

मंत्रिमंडळाचा अभ्यासपूर्वक विस्तार: फोंड्याचीही तटबंदी मजबूत
BJP
BJPDainik Gomantak
Published on
Updated on

सुशांत कुंकळयेकर

मडगाव: सर्वांधिक लोकसंख्या असलेल्या सासष्टी तालुक्याला मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व न दिल्याने विशेषतः आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण असले तरी सुदिन ढवळीकर आणि सुभाष फळदेसाई यांना मंत्रिपद देऊन भाजपने सासष्टीच्या आशेवर न राहता पारंपरिक मतपेटी अधिक दृढ करण्याची खेळी खेळली आहे. लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून ही खेळी खेळल्याचे स्पष्ट होत आहे.

BJP
गोव्यातील पराभवानंतर काँग्रेसचा आढावा; पदभार सोहळा

राजकीय विश्लेषक क्लिओफात कुतिन्हो यांच्या मते, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोव्यात भाजपने आपला उमेदवार जिंकून आणण्याच्या दृष्टीने हे निर्णय घेतले आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला कुडचडे आणि सांगे या दोन खाण पट्ट्यांतील मतदारसंघांतही अपेक्षित असलेली आघाडी घेता आली नव्हती. त्यामुळेच आता हा खाणपट्टा अधिक मजबूत करण्यासाठी सांगेच्या फळदेसाई यांना मंत्रिपद दिले असून लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवूनच तयारी केली आहे.

सासष्टीवर नव्हे, भंडारी समाजावर अन्याय

राधाराव ग्रासियस म्हणाले, सासष्टीत भाजपला जनाधार नसल्याने या तालुक्याला प्रतिनिधित्व दिले नाही तर आश्चर्य वाटण्याची गरज नाही. मात्र, आजपर्यंत जो भंडारी समाज भाजपसोबत एकनिष्ठ राहिला, त्या समाजातील फक्त दोन मंत्र्यांना या मंत्रिमंडळात स्थान दिले असले तरी त्यांना दिलेली खाती नगण्य अशीच आहेत. त्याशिवाय रवी नाईक आणि सुभाष शिरोडकर यांची राजकीय इनिंग संपण्याच्या वाटेवर असताना एका नवीन दमदार भंडारी आमदाराला मंत्रिपद देऊन नवीन नेतृत्व तयार करण्याची तसदीही घेतलेली नाही. हे सर्व पाहता भाजपने भंडारी समाजाला गृहीत धरले आहे, असे वाटते.

पराभवाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी डावपेच

2019च्या लोकसभा निवडणुकीवेळी मगो पक्ष भाजपसोबत नव्हता. त्या निवडणुकीत मगोपने काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा दिला होता. परिणामी भाजपचे उमेदवार ॲड. नरेंद्र सावईकर यांना अवघ्या 8 हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. ही गोष्ट ध्यानात ठेवूनच यंदा सुदिन ढवळीकर यांना मंत्रिमंडळात घेतले आहे, हे स्पष्ट झाले आहे. ढवळीकर यांना मंत्रिमंडळात घेतल्यामुळे फोंडा तालुक्याला सावंत मंत्रिमंडळात 100 टक्के प्रतिनिधित्व प्राप्त झाले आहे. या तालुक्यातील चारही आमदार आता मंत्री झाले आहेत. रेजिनाल्ड यांचे समर्थक आश्विनीकुमार नाईक यांनी, भाजपने सासष्टीकडे दुर्लक्ष करून आपलेच नुकसान केले आहे. त्याचे परिणाम लोकसभा निवडणुकीत भाजपला भोगावे लागतील, असे मत व्यक्त केले आहे.

BJP
Goa Crime: मुलीला कामावर ठेवले, महिला डॉक्टरवर गुन्हा

सासष्टी तालुक्याने नेहमीच भाजपच्या विरोधात मतदान केले असून यंदा भाजपचे नावेलीचे उल्हास तुयेकर किंवा कुडतरीचे अपक्ष आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स यांना मंत्रिपद दिले तरी ही मते त्यांना भाजपच्या बाजूने वळविण्याची धमक नाही. हे माहीत असल्यामुळेच सासष्टीला बाहेर ठेवून सांगे आणि फोंड्यातील मतपेटी बळकट करण्याचा प्रयत्न केला आहे.

- क्लिओफात कुतिन्हो, राजकीय विश्लेषक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com