भाऊसाहेबांची आठवण पुसून टाकण्याचा भाजपचा प्रयत्न: सरदेसाई

गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर (Chief Minister Bhausaheb Bandodkar) यांच्या स्मृती पुसून टाकण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई (Vijay Sardesai) यांनी केला आहे.
Fatorda MLA Vijay Sardesai
Fatorda MLA Vijay SardesaiDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: गोव्यातील भाजप सरकार (BJP G overnment in Goa) केवळ आमची समृद्ध संस्कृती आणि राज्याची ओळख नष्ट करण्याचा प्रयत्न करत नाही, तर पंडित जवाहरलाल नेहरू आणि बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांच्यासह गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर (Chief Minister Bhausaheb Bandodkar) यांच्या स्मृती पुसून टाकण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई (Vijay Sardesai) यांनी केला आहे. सरकारी कार्यालये, महामंडळे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Dr. Pramod Sawant) यांच्यासह पंतप्रधान, राष्ट्रपती आणि महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांचा फोटो लावण्याच्या परिपत्रकाचा संदर्भ देत फातोर्डाचे आमदार सरदेसाई (Fatorda MLA Sardesai) म्हणाले की, स्वताचा गौरव करताना, मुख्यमंत्री सावंत यांनी भाऊसाहेब बांदोडकर, नेहरू आणि आंबेडकर यांच्यावर दुर्लक्ष केले आहे.

"मुख्यमंत्री गोव्याच्या आणि आपल्या देशाच्या लोकांच्या भावनांशी कसे खेळू शकतात? सावंत त्यांच्या पक्षाच्या सर्वोच्च संघटनेची मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे आणि यासाठी या संघटनेला पसंत नसलेल्या नेत्यांचा इतिहास मिटवण्याचे षडयंत्र रचत आहे. भाजपाचा हा अजेंडा कधीच प्रत्यक्षात येणार नाही याची खात्री आम्ही देतो.’’ असे सरदेसाई म्हणाले.

Fatorda MLA Vijay Sardesai
Goa: अचारसंहितेपूर्वीच सर्व सरकारी रिक्त पदे भरणार

भाऊसाहेब बांदोडकर हे दूरदर्शी नेते होते. त्यांनी शिक्षणात अफाट सुधारणा घडवून आणल्या, ज्यामुळे प्रत्येक गावात शाळा स्थापन करणे शक्य झाले. गोव्याच्या साक्षरतेचे श्रेय त्यांनाच जाते. ते गोंयकारांच्या हृदयात आणि मनात आहेत, आणि म्हणूनच गोव्याची संस्कृती आणि इतिहास नश्ट करण्याचा भाजपचा राजकीय अजेंडा कधीही यशस्वी होणार नाही. ” असे ते पुढे म्हणाले.

Fatorda MLA Vijay Sardesai
Goa: केपेत 'घर चलो अभियानाची' उपमुख्यमंत्र्यांनी केली सुरुवात

ते म्हणाले की, भाजप सरकारने शैक्षणिक क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर गोव्याची बदनामी केली आहे. युनेस्कोने गोव्यातील शाळांची दयनीय अवस्था उघड केली होती, त्यातील 239 शाळा एकाच शिक्षकासह चालत आहे हे उघड केले आहे. "अशा कृत्यांमुळे हे स्पष्ट होते की मुख्यमंत्री केवळ स्वत: ची जाहिरात आणि एखाद्या संस्थेचा एक विशिष्ट अजेंडा पुढे नेण्याबाबत गंभीर आहेत आणि शिक्षणाचा प्रसार किंवा आमच्या विद्यार्थ्यांच्या कल्याणाची काळजी घेण्याबद्दल नाही." असा आरोप सरदेसाई यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com