Goa BJP: 2027 मध्ये डिचोलीत ‘कमळ’च फुलणार, CM सावंतांचा दावा; हेवेदावे बाजूला ठेवून कामाला लागण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन

CM Pramod Sawant: डिचोली तालुक्यातील तिन्ही मतदारसंघात ‘कमळ’च फुलणार असा ठाम विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: 2027 च्या विधानसभा निवडणुकीत डिचोली तालुक्यातील तिन्ही मतदारसंघात ‘कमळ’च फुलणार असा ठाम विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त करुन विकासासाठी हेवेदावे बाजूला ठेवून कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा भक्कमपणे भाजप पक्षाच्या पाठीशी उभे रहावे, असे आवाहन केले. डिचोलीत भाजप कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री बोलत होते.

भाजप पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

डिचोलीतील दीनदयाळ सभागृहात आयोजित या मेळाव्यास भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नायक यांच्यासह आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, माजी सभापती राजेश पाटणेकर, माजी आमदार सिद्धार्थ कुंकळकर, नगराध्यक्ष विजयकुमार नाटेकर, जिल्हा पंचायत सदस्य प्रदीप रेवोडकर आणि ज्येष्ठ कार्यकर्ते वल्लभ साळकर उपस्थित होते.

CM Pramod Sawant
Goa BJP: 2027 मध्ये भाजप येणार चौथ्यांदा सत्तेवर! विरोधकांनी सत्तेचे 'दिवास्वप्न' पहावे; कवळेकर यांचा दावा

यापूर्वी, मांद्रेतील (Mandrem) एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी मांद्रेतही भाजप 2027च्या निवडणुकीत बाजी मारणार असल्याचे म्हटले होते. भाजपचा कार्यकर्ता हा प्रथम देश, नंतर पक्ष आणि त्यानंतर आपण स्वतः असे मानून स्वार्थाची अपेक्षा न करता कार्यरत असतो, असेही मुख्यमंत्री पुढे बोलताना म्हणाले होते.

CM Pramod Sawant
Goa CM - Minister Kumbhmela Visit: कुंभमेळा दौरा कोणाच्या खर्चावर? BJP अध्यक्षांनी दिले उत्तर Video

सुराज्य स्थापनेसाठी साथ द्या

मांद्रे मतदारसंघात पहिल्यांदा पोहोचलो असून मार्गदर्शन नव्हे, तर लेखाजोगा घेण्यासाठी आलो आहे. कार्यकर्ते किती वाढले, कसे कार्य करतात. या विस्तार बैठकीत किती बूथ अध्यक्ष, किती मंडल सदस्य पदाधिकारी आलेत याकडे आपले लक्ष आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेकदा तह केला, तो केवळ स्वराज्य स्थापनेसाठीच. त्या पद्धतीने राज्यात डॉ. प्रमोद सावंत, भाजपला (BJP) करावा लागतो. भाजप सुराज्य स्थापनेसाठी कटिबध्द आहे. त्यासाठी मनोहर पर्रीकर यांच्या स्वप्नाला साथ द्या, माजी आमदार दयानंद सोपटे व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना साथ द्या, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक यांनी केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com