Goa Politics: 'भाजप चाळीसही जागा लढवणार'! दामूंची मोठी घोषणा; मगोपसह अपक्षांना सूचक संदेश

Damu Naik: प्रदेशाध्यक्ष दामू नाईक म्‍हणाले, की २०२७ मध्ये २७ नव्हे, तर २०२७ मध्ये २७ हून अधिक असे भारतीय जनता पक्षाचे लक्ष्य आहे.
Damu Naik
Damu NaikDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: भाजप येत्या (२०२७च्‍या) विधानसभा निवडणुकीत ४० पैकी ४० जागा लढवेल. पक्ष एकही जागा अन्य कुणाला सोडणार नाही, असे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी आज मडगावात जाहीर केले. पुढील निवडणूक रणांगणात मगोपची साथ न घेता उतरण्‍यासह विद्यमान समर्थक तीन अपक्षांना भाजपची उमेदवारी स्वीकारण्यावाचून गत्‍यंतर नसल्‍याचा सूचक संदेशच नाईक यांनी दिला आहे.

डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी भाजप प्रवेशाची तयारी दर्शवली आहे. त्यांनी अलिकडे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) बी. एल. संतोष यांची भेटही घेतली होती. कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स व कुठ्ठाळीचे आमदार आंतोन वाझ यांना भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक लढवणे सोयीचे ठरणार नाही. त्यामुळे तेथे भाजप कोणाला उमेदवारी देणार असा प्रश्न आहे.

भाजपच्या दक्षिण गोव्यातील सक्रिय पक्ष सदस्यांसाठीच्या बैठकीत बोलताना प्रदेशाध्यक्ष दामू नाईक म्‍हणाले, की २०२७ मध्ये २७ नव्हे, तर २०२७ मध्ये २७ हून अधिक असे भारतीय जनता पक्षाचे लक्ष्य आहे. काही लोकांना अधिक ऐकू आले नसेल. म्हणूनच ते भाजपचे २०२७ मध्ये २७ च का? ४० का नाही? असे प्रश्न विचारू लागले आहेत.

Damu Naik
BJP Foundation Day Goa: 'देशात रामराज्य आलेच आहे, सुराज्यही येईल'! मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास, राज्यभरात स्थापनादिन उत्साहात साजरा

मात्र, भारतीय जनता पक्ष २०२७ मध्ये चाळीसही मतदारसंघात आपले उमेदवार उभे करणार आहे. प्रत्येक मतदारसंघात पक्षाचे संघटन मजबूत आहे व आम्हाला २७ पेक्षा जास्त जागा जिंकण्याची संधी आहे. भाजप एकही जागा अन्य कुणालाही सोडणार नाही. गोव्यात ४ लाख २५ हजार सदस्य, तर ३ हजार ७०० सक्रिय सदस्य आहेत.

Damu Naik
Goa Politics: एल्टन धादांत खोटे सांगताहेत, त्यांना भाजपमध्ये कुणी बोलावलेच नाही! फातर्पात मुख्यमंत्र्यांचे स्‍पष्‍टीकरण

नव्‍या नेपथ्‍याची नांदी

मगोच्या जीत आरोलकर (मांद्रे) व सुदिन ढवळीकर (मडकई) या दोन्ही आमदारांचा भाजप सरकारला पाठिंबा आहे. त्याशिवाय शिरोडा, प्रियोळ, पेडणे, सावर्डे या मतदारसंघावर मगोप दावा करू शकतो. यामुळे ४० मतदारसंघात भाजप उमेदवार उभे करणार, तर मगो युतीत नसेल हेही आता स्पष्ट होऊ लागले आहे. मगो विधानसभा निवडणुकीत आपल्यासोबत नसेल, असे गृहित धरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष राजकीय नेपथ्य आकाराला आणत आहेत, का याकडे राजकीय निरीक्षकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com