Goa Cashews Festival : गोव्यात काजू महोत्सवाचं होणार आयोजन

काजू महोत्सवात फक्त काजूच नाही तर काजूशी निगडीत अन्य प्रक्रियाही दाखवल्या जाणार आहेत.
BJP MLA Deviya Rane
BJP MLA Deviya RaneDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Cashews Festival : नेहमीच विविध महोत्सवांनी गजबजलेल्या गोव्यात आला लवकरच काजू महोत्सवही आयोजित केला जाणार आहे. गोव्यात काजू महोत्सवाचं आयोजन करणार असल्याची घोषणा पर्येच्या आमदार दिव्या राणे यांनी केली आहे. सध्या काजूचं पुरेसं उत्पादन होत नसल्यामुळे आफ्रिकेतून काजू आयात केली जाते. मात्र गोव्याला पुढील पाच ते दहा वर्षात काजू उत्पादनात स्वयंपूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात काजूची लागवड केली जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

काजू महोत्सवात फक्त काजूच नाही तर काजूशी निगडीत अन्य प्रक्रियाही दाखवल्या जाणार आहेत. यात काजूच्या बोंडापासून हुर्राक, फेणी बनवण्याची प्रक्रिया, काजू भाजणे, काजूपासून बनवले जाणारे विविध पदार्थ आदी गोष्टींची रेलचेल या काजू महोत्सवात असेल.

तर दुसरीकडे गोव्याला स्वयंपूर्ण बनवण्यासाठी गोवन ब्रँड म्हणून नाचणी पिकाच्या लागवडीला प्रोत्साहन देणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी नुकतंच एका कार्यक्रमात सांगितलं. तसंच गोव्याला प्लास्टिकमुक्त करण्याची जबाबदारी पंचायतींची असल्याचं वक्तव्य गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केलं होतं. मनुष्यबळ विकास, कौशल्यपूर्ण गोमंतकीय युवक घडवण्यासाठीही पंचायतींनी पुढाकार घ्यावा, असं आवाहनही त्यांनी केलं होतं.

BJP MLA Deviya Rane
CM Pramod Sawant : गोव्याला प्लास्टिकमुक्त करण्याची जबाबदारी पंचायतींची

यासोबतच गोव्याला विकासाच्या मार्गावर पुढे नेण्यासाठी पंचायतींनी पुढाकार घेण्याचं आवाहनही मुख्यमंत्री सावंत यांनी केलं होतं. पंचायतींनी ऑनलाईन सेवा तसंच नैसर्गिकरित्या शेती करण्यावर भर द्यावा, असं आवाहनही मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केलं. मुख्यमंत्र्यांनी याबाबत मंत्र्यांनाही पंचायतींसोबत काम करण्याच्या सूचना दिल्या होत्या. स्वयंपूर्ण गोवा 2.0 मोहिमेअंतर्गत यापुढे प्रत्येक मंत्र्याला महिन्यातून किमान एकदा पंचायतींशी संवाद साधणं बंधनकारक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com