भाजप महिला मोर्चा राज्य कार्यकारिणी बरखास्त

शीतल नाईक होत्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष
BJP Mahila Morcha state executive sacked in Goa
BJP Mahila Morcha state executive sacked in GoaDainik Gomantak

गोव्यात नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या. यावेळी राज्यात निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक राजकीय किस्से समोर आले आहेत. अनेक नेते कार्यकर्ते नाराज असल्याचे पाहायला मिळाले. तसेच यावेळी पुन्हा भाजपने बाजी मारत सरकार स्थापन केले आहे. आज गोवा विधानसभेच्या सभापतीपदासाठी आज मंगळवारी निवडणूक झाली. यात भाजपच्या रमेश तवडकर यांची विधानसभा सभापतीपदी निवड झाली आहे. त्यांनी या निवडणुकीत काँग्रेसच्या आलेक्स सिक्वेरा यांचा 24 विरुद्ध 15 मतांनी पराभव केला आहे.

दरम्यान, भाजप (BJP) महिला मोर्चा राज्य कार्यकारिणी देखील भाजपच्या नेत्यांनी बरखास्त केली आहे. भाजप महिला मोर्चा राज्य कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी शीतल नाईक होत्या. आता नव्या कार्यकारिणीची लवकरच घोषणा करण्यात येणार आहे अशी माहिती भाजपा नेते सदानंद तानावडे (Sadanand Tanawade) यांनी दिली आहे. आता नव्याने अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

BJP Mahila Morcha state executive sacked in Goa
'आमदार ते सभापती' असा आहे रमेश तवडकर यांचा राजकीय प्रवास

दरम्यान, गृहलक्ष्मी योजनेद्वारे महिलांना दरमहा 5,000 रुपयांचे आमिष दाखवून त्यांची दिशाभूल केल्याबद्दल भाजप महिला मोर्चाने मंगळवारी टीएमसीवर जोरदार निशाणा साधला आणि महिलांना वैयक्तिक डेटा पक्षाशी शेअर न करण्याचे आवाहन केले होते.

भारतीय निवडणूक आयोगाला दिलेल्या निवेदनात टीएमसीवर कारवाई करण्याची मागणी केली होती. महिला मोर्चाच्या माजी अध्यक्षा शीतल नाईक यांनी अशा पद्धतीने अनेक कामे राज्यात केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com