गोव्यात पुन्हा एकदा भाजपचे सरकार येणार; आमदार दयानंद सोपटे!

जनतेच्या बळावर पुन्हा एकदा भाजपा सरकार सत्येवर येणार; आमदार दयानंद सोपटे
MLA Dayanand Sopte
MLA Dayanand SopteDainik Gomnatak
Published on
Updated on

भाजपा सरकार हे सर्वसामान्य जनतेचे दुःख जाणून घेवून आणि दुरदुर्ष्टी विचार करून योजना करत असतात आणि भाजप सरकारचे आमदार आणि कार्यकर्त्ये त्या योजना लोकापर्यंत पोचवण्याचे काम करतात, त्याच जनतेच्या बळावर पुन्हा एकदा भाजपा सरकार सत्येवर येणार आहे, उर्वरित योजना प्रत्येक घरापर्यंत पोचवण्यासाठी जनतेने भाजपला साथ द्यावी असे आवाहन मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे (MLA Dayanand Sopte) यांनी आपल्या मांद्रे कार्यालयात आयोजित केलेल्या मतदार संघातील कोरोनामुळे ज्याचे निधन झाले त्यांच्या नातेवाईक वारसदारांना सरकारतर्फे 2 लाख मंजुरीचे पत्रे वितरीत केल्यानंतर ते बोलत होते.

MLA Dayanand Sopte
कुठ्ठाळी मतदारसंघातही जनमन उत्सवाचे स्‍वागत

यावेळी गोवा पर्यटन विकास महामंडळ संचालक सुदेश सावंत उपस्थित होते.

मांद्रे मतदार संघातील कोरोना महामारीने काही जणांचे बळी घेतले. त्याच्या वारसदाराना नातेवाईकाना गोवा सरकारकडून 2 लाख रुपये मंजूर झाले त्याचे वितरण करताना केंद्र सरकारकडून अतिरिक्त 50000 पन्नास हजार रुपये मिळणार आहे त्याचेही अर्ज यावेळी आमदार सोपटे यांनी वितरीत केले.

आमदार दयानंद सोपटे यांनी पुढे बोलताना सरकार प्रत्येक घटका पर्यंत पोचवण्यासाठी योजना राबवत आहे, जे कोरोना महामारीतून जीव गमावला त्याना २ लाख हि मोठी रक्कम नसली तरी थोडा कुटुंबियाना आधार देण्यासाठी राज्य सरकारने योजना आखून कार्य केलेले आहे. शिवाय केंद्र सरकारकडून 50000 पन्नास हजार रुपये दिली जाईल असे सांगून कोरोना काळात सरकारने कठीण प्रसंग काळजावर दगड ठेवून अनेकांनी आपला जीव धोक्यात घालून मदतीचा हात पुढे केला आणि ते कोरोना योद्धे बनले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नैतृत्वाखाली देश आणि मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या नैतृत्वाखाली राज्य सुरक्षित असल्याचे सांगून पुन्हा एकदा भाजपा सरकार सत्येवर येण्यासाठी कार्यरत होवुया असे आवाहन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com