कोरोना रोखण्यात भाजप सरकार फेल; 'आप'ची हेल्पलाइन सुरु

BJP government fails to stop Corona; AAP helpline started
BJP government fails to stop Corona; AAP helpline started
Published on: 
Updated on: 

पणजी: कोरोना महामारीचा कहर रोखण्यात गोव्यातील भाजप सरकारला अपयश आले आहे. लोकांना वेळेवर उपचार मिळत नसल्याचा आरोप करीत आम आदमी पक्षाने नागरिकांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. त्यांना घरीच वैद्यकीय सल्ला मिळावा म्हणून आपने हेल्पलाइन (Helpline) सुरू केली आहे.'आम आदमी पार्टी'ने (Aam Aadmi Party) पुढे येत कोरोना रुग्णांबरोबर (Corona patients) सामान्य नागरिकांच्या मदतीसाठी हे पाऊल टाकले आहे. याद्वारे कोरोनासंबंधी वैद्यकीय सल्ला (Medical advice) दूरध्वनीद्वारे दिला जाणार आहे. त्यासाठी या पक्षाने एक नंबर जाहीर केला आहे. हेल्पलाइनचा नंबर 7504750475  हा असून, त्यावर कोरोना बाधित वा त्याच्या‌ नातेवाइकांना कॉल (call) करता येईल, असे या पक्षाने निवेदनात म्हटले आहे.  (BJP government fails to stop Corona; AAP helpline started)

 हेल्पलाइनला (helpline) संपर्क केल्यानंतर रुग्णाला होणारा त्रास आणि संबंधित लक्षणांच्या आधारे डॉक्टर त्याला वैद्यकीय सल्ला देतील. त्यामुळे रुग्ण गंभीर आजारापासून बचाव करू शकेल. कोरोनाचा संसर्ग झालेले रुग्ण, लक्षणे असलेल्या व्यक्ती आणि गृहविलगीकरणातील व्यक्ती यांच्यासाठी ही हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे.

गोवा 'बेहाल'
गोव्यात कोरोनामुळे परिस्थितीत वाईट झाली आहेत. गेल्या सात दिवसात सरकाराच्या हलगर्जीपणामुळे 75 जणांचा मृत्यू झाला आहे. अशी स्थिती असूनही गोवा सरकार रुग्णांवर उपचार करण्यास असमर्थ ठरत आहे. रुग्णालयात योग्य उपचार मिळत नसल्याने अनेक रुग्णांना त्यांचे‌ प्राण गमवावे लागत असल्याची‌ टीकाही निवेदनात करण्यात आली आहे.

कोरोना संबंधी वैद्यकीय सल्ला देण्यासाठी हेल्पलाइन सुरु करण्याबरोबरच नागरिकांना ऑक्सिमीटर आणि खाद्य पदार्थांचे वितरण केले जात आहे. तसेच रुग्णांना औषधे दिली जात असून सरकारकडून उपचार मिळाला नाही, अशा रुग्णांना डॉक्टरसह वैद्यकीय सुविधा दिला जात असल्याचा दावा या पक्षाने केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Pramod Sawant supports Jit Arolkar in Mandrem
Goa Assembly elections 23 constituencies
Canacona Silent Protest
 Yuri Alemao Girish Chodankar