गोव्याला भाजपने आंतरराष्ट्रीय स्तरावर बदनाम केले: सरदेसाई

"शैक्षणिक क्षेत्राला बाजूला सारून भाजपने आंतरराष्ट्रीय स्तरावर गोव्याला बदनाम केले आहे." असे सरदेसाई (Sardesai) म्हणाले.
Vijay Sardesai
Vijay SardesaiDainik Gomantak

मडगाव: गोवा फॉरवर्ड पक्षाचे (Goa Forward Party) अध्यक्ष विजय सरदेसाई (Vijay Sardesai) यांनी गुरुवारी सांगितले की संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (UNESCO) ने भाजप सरकारच्या अपुऱ्या आणि अपयशी शिक्षण पद्धतीचा पर्दाफाश केला आहे, जे एकाच शिक्षकासह राज्यात 239 शाळा चालवत आहे. "शैक्षणिक क्षेत्राला बाजूला सारून भाजपने आंतरराष्ट्रीय स्तरावर गोव्याला बदनाम केले आहे." असे सरदेसाई म्हणाले. “हे लज्जास्पद आहे की भाजप सरकार शिक्षण क्षेत्राचे संरक्षण आणि संवर्धन करण्यात अपयशी ठरले आहे. या अहवालात स्पष्टपणे म्हटले आहे की, गोव्यातील 16.08 टक्के शाळांमध्ये फक्त एक शिक्षक आहे, ज्यामुळे राज्य या श्रेणीमध्ये देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे.’’ असे सरदेसाई म्हणाले.

अहवालानुसार, राज्यातील 1,486 शाळांपैकी, 239 शाळा म्हणजे 16.08 टक्के शाळा एकल शिक्षकांच्या शाळा आहेत. एकूण 93३ टक्के या एकल शिक्षक शाळा ग्रामीण भागात आहेत. सरकारने शैक्षणिक क्षेत्राकडे इतके दुर्लक्ष करू नये, उलट सरकारने प्राधान्य दिले पाहिजे आणि नवीन प्रणाली विकसित केल्या पाहिजेत आणि विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाची निवड केली पाहिजे. पण गोव्यात असे काही उपलब्ध नाही. ” असे सरदेसाई म्हणाले. “एकच शिक्षक, अनेक विद्यार्थी आणि विषयांसह शाळा कशी चालवू शकतो. यामुळे विद्यार्थी त्यांचे विषय शिकण्यापासून वंचित राहतील. ” असे सरदेसाई यांनी निदर्शनास आणले.

Vijay Sardesai
Goa: ऑक्सिजन प्लांटचे मुख्यमंत्री सांवत याच्या हस्ते उद्घाटन

सरदेसाई म्हणाले की, जेव्हा जेव्हा निवडणुका जवळ येतात, मुख्यमंत्री सावंत हजारो नोकऱ्यांचे आश्वासन देतात, पण ते प्रत्यक्षात कधीच येत नाहीत. "या अहवालासह राज्यातील लोकांना हे समजले पाहिजे की हे सावंतवाडी सरकार केवळ खोटी आश्वासने देऊन तरुणांना फसवत आहे." असे सरदेसाई म्हणाले. "जर मुख्यमंत्री सावंत (Chief Minister Sawant) खरोखरच शैक्षणिक क्षेत्राबद्दल गंभिर असतील तर त्यांनी या समस्येकडे लक्ष दिले पाहिजे होते आणि शिक्षकांची भरती करायला हवी होती." असे सरदेसाई म्हणाले. सरदेसाई यांनी आरोप केला की सावंत यांनी शैक्षणिक क्षेत्राचे प्राधान्य बाजूला केले आहे आणि केवळ निवडणुकांवर लक्ष केंद्रित केले आहे. "विद्यार्थ्यांना चांगली इंटरनेट सेवा देण्याचे वचन त्यांनी पाळले नाही. दुर्गम भागात मोबाईल नेटवर्क कनेक्टिव्हिटी देण्यात ते अपयशी का ठरले आणि एका शिक्षकासह शाळा का चालवत आहेत याचे उत्तर त्यांनी लोकांना द्यावे. ’’ असा प्रश्न सरदेसाईं यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com