South Goa BJP Candidate: भाजपकडून शिक्कामोर्तब! दक्षिण गोव्यातून अखेर पल्लवीच!

Goa Lok Sabha Election: इच्छुक उमेदवारांच्या नावांवर फुली; पहिल्यांदाच महिलेला संधी
Pallavi Dempo- South Goa BJP Candidate
Pallavi Dempo- South Goa BJP CandidateDainik Gomantak

Goa Lok Sabha Election: दक्षिणेतील उमेदवारीच्या स्पर्धेतील इच्छुक माजी खासदार ॲड. नरेंद्र सावईकर, माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, माजी आमदार दामू नाईक या पुरुष उमेदवारांसह इच्छुक महिला शेफाली वैद्य, सुवर्णा तेंडुलकर, सुलक्षणा सावंत यांची नावेही मागे सारली गेली.

रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दिल्लीतील भाजप कार्यालयातून प्रदेश कार्यालयात दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराचे नाव सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत जाहीर केले जाईल, अशी माहिती मिळाली होती.

यादी आल्यानंतर पत्रकार परिषद घेण्याची प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी तयारीही केली होती. मात्र, रात्री सव्वानऊ वाजता ही यादी दिल्लीतून जाहीर करण्यात आली आणि गोव्यात रात्री साडेनऊ वाजता पत्रकार परिषद पार पडली.

आता खऱ्या अर्थाने भाजपच्या नेत्यांना आता धेंपे यांना निवडून आणण्याची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.

Pallavi Dempo- South Goa BJP Candidate
I-League 2 Football Tournament: धेंपो क्लबचा विजय, स्पोर्टिंग गोवा पराभूत

लोकसभा निवडणुकीसाठी दक्षिण गोव्यातून पल्लवी धेंपे यांना उमेदवारी देऊन भाजपने नवा इतिहास रचण्याचे मनसुबे रचले असले तरी सामान्य कार्यकर्त्यांकडून मात्र संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

दक्षिण गोव्यात भाजपची स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असली, तरी धेंपे हा चेहरा या मतदारसंघाला नवीन असल्याने त्यांना मतदारांसमोर पोहोचविण्यासाठी आणि जिंकून आणण्यासाठी बराच घाम गाळावा लागणार आहे.

..तर पल्लवी होणार दुसऱ्या महिला खासदार :-

राज्यात भले महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांच्या तुलनेत जास्त असली, तरी लोकसभा निवडणुकीत गेल्या ६१ वर्षांत केवळ एकाच महिलेने लोकसभेची निवडणूक जिंकली आहे.

१९८० साली मगोपच्या संयोगिता राणे यांनी कॉंग्रेसचे तत्कालीन खासदार पुरुषोत्तम काकोडकर यांचा २७ हजार ५०० मतांनी पराभव केला होता. त्यानंतरच्या दोन निवडणुकांत मात्र त्यांना अपक्ष लढताना यश मिळू शकले नाही.

कोण आहेत पल्लवी धेंपे?

  • उद्योजक आणि शिक्षणतज्ज्ञ

  • मडगावच्या पार्वतीबाई चौगुले महाविद्यालयातून रसायनशास्त्रात पदवी, पुण्याच्या एमआयटी येथून व्यवसाय व्यवस्थापनामध्ये (एमबीए) पदव्युत्तर पदवी

  • धेंपो उद्योगाच्या कार्यकारी संचालक.

  • धेंपो चॅरिटीज ट्रस्टच्या विश्वस्त.

  • व्यवसायातील माध्यमे आणि रिअल इस्टेट विभागावर देखरेख.

  • विद्यापीठपूर्व शिक्षण देणाऱ्या चार संस्थांच्या चालक

  • धेंपो विश्वग्राम शाळेच्या संरक्षक.

  • मुलींना व्यावसायिक शिक्षण देण्यासाठी सरकारी शाळा दत्तक घेतल्या.

  • इंडो-जर्मन एज्युकेशनल ॲण्ड कल्चरल सोसायटीच्या अध्यक्ष.

  • वेंडेल रॉड्रिग्स यांनी सुरू केलेल्या गोव्यातील फॅशन आणि टेक्सटाईल म्युझियम, मोडा गोवा फाऊंडेशनच्या विश्वस्त.

  • गोवा कॅन्सर सोसायटीच्या व्यवस्थापकीय समितीच्या सदस्य.

  • २०१२ ते २०१६ पर्यंत गोवा विद्यापीठाशी संलग्न शैक्षणिक परिषदेच्या सदस्य.

  • मोदींच्या नावावर मतदान होणार, मग उमेदवार कोणीही असो!

  • धेंपेंच्या उमेदवारीवर दक्षिणेतील कार्यकर्त्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com