मुरगाव मतदारसंघात हाणामारीने राजकीय वातावरण तापलेले

मुरगाव मतदारसंघात हाणामारीमुळे भाजप - काँग्रेसमध्ये चिकलफेक
 BJP VS Congress
BJP VS CongressDainik Gomantak

पणजी : नुकत्याच गोवा विधानसभा निवडणूकांचा निकाल जाहीर झाला असून भाजपला बहुमत मिळाले आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा डॉ. प्रमोद सावंत हेच मुख्यमंत्री होणार असून सावंत यांचे सरकार अस्तित्वात येणार आहे. याच्याआधीच गोव्याच्या राजकारणार सत्ता काबीज करण्यासाठी काटशाहचे राजकारण सुरू झाले मुरगाव मतदारसंघात राजकीय पक्षांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाल्याने वातावरण तंग बनले आहे.

मुरगावातील बोगदा आणि इतर परिसरात शुक्रवारी संध्याकाळपासून होळीमुळे वातावरण खेळीमेळीचे बनले होते. पण सायंकाळी मुरगावचे नगरसेवक प्रजय मयेकर यांचे वडील प्रदीप मायेकर हे घरी परतत असताना त्यांच्यावर सुमारे 45 ते 50 जनांनी हल्ला केल्या त्यांत ते जखमी झाले. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय, चिकलीम येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर याप्रकरणी मुरगाव पोलिसांकडूण 9 जणांना अटक करण्यात आली असून अन्य 38 जणांचा शोध सुरू आहे. तर भाजप - काँग्रेसमध्ये चिकल फेक सुरू झाली असून या हाणामारीला काळजावाहू मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हेच कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. (BJP-Congress allegations each other due to clashes in Murgaon constituency)

दरम्यान मुरगावचे (Mormugao) नगरसेवक प्रजय मयेकर यांनी, आपल्या वडीलांवर हल्ला हा काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार (MLA) संकल्प आमोणकर यांच्या कार्यकर्त्यांनी व समर्थकांनी केल्याचा आरोप केला आहे. तर नितीन भगत यांनी आरोप केला की, प्रदीप मायेणकर यांच्या वाहनाने त्यांना धडक दिली. तसेच गाडीतून उतरत मायेणकर यांनी त्यांना शिवीगाळ केली. काही वेळातच मायेणकर यांच्या धाकट्या भावाने त्यांच्या डोक्यात दगड मारला आणि त्यावरून दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये जोरदार वादावादी झाली. आणि त्यानंतर हाणामारी झाली. याचबरोबर भगत यांनी पोलीसांवर आरोप करताना, पोलीस ठाण्यात माझ्या डोक्यातून रक्त येत असताना पोलिसांनी मदत केली नाही, असे म्हटले आहे.

 BJP VS Congress
पोलिसांनी सामान्य जनतेला संरक्षण द्यावे: अमरनाथ पणजीकर

राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि पोलीस महासंचालक आय. डी. शुक्ला यांनी उपजिल्हा रुग्णालय, चिकलीम येथे जखमी मयेकर यांची भेट घेतली. त्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री (CM) यांनी, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल आणि कोणालाही सोडले जाणार नाही, असे म्हटले. तर 'तृणमूल काँग्रेस पार्टी' (TMC) ची हाणामारीची संस्कृती काँग्रेस पक्षाने स्वीकारल्याची टीका सावंत यांनी केली. तसेच पराभूत झालेल्या कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना मारहाण करण्याची गोव्यात कधीही संस्कृती नव्हती. ही काँग्रेस आणि टीएमसीची संस्कृती असून सरकार अशा प्रकारच्या हिंसाचाराला खपवून घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, काँग्रेस पक्षाकडूननही याप्रकरणावर तिखट प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यावर काँग्रेस आरोप केला की राज्यात भाजपची हुकूमशाही सुरू झाली आहे. दुर्दैवाने म्हणावे लागेल की, भाजप उमेदवार पराभूत झालेल्या मतदारसंघात भाजपचे (BJP) गुंड काँग्रेस कार्यकर्त्यांना लक्ष्य करत आहेत. तर काँग्रेसच्या मध्यवर्ती कक्षाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, 'पोलीस नागरिकांचे रक्षण करण्याऐवजी भाजपच्या गुंडांना संरक्षण देत आहेत. हे दुर्दैवी आहे.'

 BJP VS Congress
मारहाणप्रकरणी 47 जणांविरोधात गुन्हे दाखल, प्रमोद सावंत म्हणाले...

तसेच पणजीकर यांनी, काळजीवाहू मुख्यमंत्री सावंत यांना लक्ष करतना, काळजीवाहू मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मुरगावमध्ये येत राजकीय नाट्य रचले. याचा मला धक्का बसल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर, निष्पाप लोकांवर वाहने घालणे ही भाजपची संस्कृती आहे.

विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले भाजपचे उमेदवार हताश झाले असून त्यांनी पाठिंबा न देणाऱ्या जनतेला त्रास देणे, शिवीगाळ करणे सुरू केले आहे. केपे (Quepem), कुंकळी (Cuncolim), साळगाव (Saligao), कुडतरी (Curtorim) आणि इतर अनेक मतदारसंघातून अशा घटनांची नोंद आहे. हे असेच सुरू राहिल्यास काँग्रेसचे (Congress) कार्यकर्ते जशाच तसे उत्तर देतील, असा इशारा त्यांनी दिला. तर डीजीपींनी अशा घटनांची गंभीर दखल घेऊन गोव्यातील जनतेला संरक्षण द्यावे. मुरगाव येथे काँग्रेस कार्यकर्त्यांवर हल्ला करणाऱ्या खऱ्या दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी डीजीपींकडे केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com