Goa Politics
Goa PoliticsDainik Gomantak

Goa Politics: एका तरी महिलेला उमेदवारी द्या

Goa Politics: भाजपचे काँग्रेसला आव्हान : सार्दिन यांच्‍या कार्यक्षमतेवर प्रश्‍‍नचिन्‍ह
Published on

Goa Politics:

भाजपच्या उमेदवारांबाबत बोलण्यापेक्षा काँग्रेस पक्षाने गोव्यात किमान एका महिलेला तरी उमेदवारी जाहीर करावी, असे खुले आव्हान भाजपचे प्रवक्ते गिरीराज पै वेर्णेकर यांनी दिले आहे. येथील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी माजी आमदार ग्लेन टिकलो व माजी नगरसेवक राजसिंह राणे उपस्थित होते. भाजपने उत्तरेतून विद्यमान खासदारांना सहाव्यांदा उमेदवारी दिली, परंतु काँग्रेसने आपला दक्षिणेतील विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन यांना अद्याप तिकीट जाहीर केलेले नाही. याचाच अर्थ काँग्रेसवाले सार्दिन यांना अपयशी समजतात का, असा सवाल वेर्णेकर यांनी उपस्‍थित केला.

सध्या ‘आप’ व काँग्रेसवाले अरविंद केजरीवाल यांना अटक केली म्‍हणून गळा काढत आहेत. विशेष म्‍हणजे या घोटाळ्याबाबत काँग्रेसनेच सर्वांत आधी तक्रार करत केजरीवाल यांच्यावर कारवाईची मागणी केली होती, अशा शब्दांत वेर्णेकरांनी काँग्रेसवर टीका केली.

Goa Politics
Margao Theft News: नावेली चोरी तपासाला कलाटणी

2014 ते 2022 या काळात खलिस्तानी गटांनी ‘आप’ला सुमारे १३४ कोटी रुपये देणगी दिल्याचे खलिस्तानी नेता गुरपतवंत सिंग पन्नून याने म्हटले आहे. याचा खुलासा आधी अमित पालेकर यांनी करावा आणि नंतरच भाजपवर बोलावे.

- गिरीराज पै वेर्णेकर, भाजप प्रवक्ते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com