BITS Pilani Carbon Research: कार्बन उत्सर्जनावर 'स्मार्ट' उपाय! केंद्राकडून बिट्स पिलानीला महत्त्वाची जबाबदारी

Carbon Footprint Reduction Cement: सिमेंट उद्योगातून मोठ्या प्रमाणावर होणारे कार्बन उत्सर्जन आटोक्यात आणण्यासाठी आता बिट्‌स पिलानी संशोधन करणार आहे. केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने हे काम त्यांच्‍याकडे सोपवले आहे.
Carbon Footprint Reduction Cement
BITS Pilani Carbon ResearchDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: सिमेंट उद्योगातून मोठ्या प्रमाणावर होणारे कार्बन उत्सर्जन आटोक्यात आणण्यासाठी आता बिट्‌स पिलानी संशोधन करणार आहे. केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने हे काम त्यांच्‍याकडे सोपवले आहे. बिटस पिलानी, आयआयटी मद्रास आणि अल्ट्राटेक सिमेंट या आघाडीच्या संस्था आणि उद्योगसमूहाच्या संलग्न प्रकल्पाला सुमारे ३४ कोटी रुपयांची आर्थिक मदत केंद्र सरकारने जाहीर केली आहे. यामध्ये २५ कोटींचे अनुदान मंत्रालयातर्फे तर्फे तर उर्वरित रक्कम अल्ट्राटेक सिमेंटने उचलली आहे.

बिटस पिलानी, आयआयटी मद्रास आणि अल्ट्राटेक सिमेंट या आघाडीच्या संस्था आणि उद्योगसमूहाच्या संलग्न प्रकल्पाला सुमारे ३४ कोटी रुपयांची आर्थिक मदत केंद्र सरकारने जाहीर केली आहे. यामध्ये २५ कोटींचे अनुदान मंत्रालयातर्फे तर्फे तर उर्वरित रक्कम अल्ट्राटेक सिमेंटने उचलली आहे.

Carbon Footprint Reduction Cement
BITS Pilani: परीक्षेच्या तोंडावर 3 विद्यार्थ्यांनी संपवले जीवन, 'बिट्स पिलानी' प्रकरणी राज्यपाल पिल्लईंनी मागितला अहवाल

या अनोख्या शासकीय-खासगी भागीदारी प्रकल्पांतर्गत देशात पाच ‘कार्बन कॅप्चर अँड युटिलायझेशन’ प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहेत. या प्रयोगशाळांमध्ये कार्बनचे उत्सर्जन अडवून त्याचा पुनर्वापर करण्याच्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. बीआयटीएस पिलानी व आयआयटी मद्रास मिळून एका टन प्रतिदिन क्षमतेचा पायलट प्लांट उभारणार आहेत, ज्यात कार्बन कॅप्चर तंत्रज्ञानासोबतच मिनरलायझेशन प्रक्रिया एकत्रित केली जाईल. सिमेंट उद्योग हा कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनाचा एक मोठा स्रोत आहे. भारतात (India) आणि जगभरातदेखील एकूण औद्योगिक कार्बन उत्सर्जनात सिमेंट उद्योगाचा मोठा वाटा आहे.

या संशोधनाचा फायदा काय?

1. पर्यावरणपूरक उत्पादन : कार्बन उत्सर्जनात लक्षणीय घट होऊन पर्यावरणावर होणारा नकारात्मक परिणाम कमी होईल.

2. भारताच्या ‘नेट झिरो’ उद्दिष्टांमध्ये मदत : भारताच्या ‘नेट झिरो’ उत्सर्जनाच्या उद्दिष्टच्या पूर्ततेसाठी ही तंत्रज्ञानात्मक मदत ठरेल.

3. सिमेंट उद्योगाचे रूपांतर : परंपरागत प्रदूषणकारी उत्पादनातून पर्यावरणस्नेही उत्पादनाकडे सिमेंट उद्योग वळेल.

4. कचऱ्याचा पुनर्वापर : पकडलेला कार्बन वायू विविध औद्योगिक प्रक्रियांत किंवा नव्या उत्पादक वस्तूंमध्ये वापरला जाऊ शकतो- जसे की, कृत्रिम खनिजे, इको-फ्रेंडली बांधकाम साहित्य.

5. तंत्रज्ञान निर्यात आणि रोजगार (Employment) निर्मिती : ही यंत्रणा भारतात यशस्वी ठरल्यास इतर देशांना निर्यात करता येईल. त्यातून नवीन संशोधन व उत्पादन कंपन्या उभ्या राहतील व उच्च प्रशिक्षित रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

Carbon Footprint Reduction Cement
BITS Pilani: परीक्षेच्‍या तणावामुळेच आत्‍महत्‍या! बिट्‌स पिलानी प्रकरणावरती पोलिसांचा निष्कर्ष; हॉस्टेलमध्ये CCTV बसविण्‍याचा निर्णय

या प्रकल्पात खालील बाबींवर होईल संशोधन

1. कार्बन कॅप्चर तंत्रज्ञान : सिमेंट उत्पादनावेळी निर्माण होणाऱ्या कार्बन वायूला वातावरणात सोडण्याऐवजी वेगळा करून अडवण्याचे यंत्र विकसित करणे.

2. मिनरलायझेशन : पकडलेला कार्बन वायू काही रासायनिक प्रक्रियेद्वारे खनिजांमध्ये रूपांतरित केला जाईल, जेणेकरून तो स्थिर रूपात साठवता येईल.

3. उद्योगातील प्रत्यक्ष प्रायोगिक वापर : एक टन प्रतिदिन क्षमतेचा पायलट प्लांट प्रत्यक्ष सिमेंट कारखान्यात उभारून प्रत्यक्ष तंत्रज्ञानाची कार्यक्षमता तपासणार.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com