Goa Accident: बाईक-टॅंकरचा अपघात, ‘बिट्स’च्या विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू; निष्काळजीपणाबद्दल टँकरचालक अटकेत

Goa Accident Death: ‘बिट्स पिलानी’चा विद्यार्थी करण नृसिंह मूर्ती याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी वेर्णा पोलिसांनी टँकरचालक पेद्रो मेडेरा याच्याविरोधात गुन्हा नोंद करून त्याला अटक केली.
Goa Accident Death
Goa Accident DeathDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को : बेदरकार व निष्काळजीपणे वाहन चालवून ‘बिट्स पिलानी’चा विद्यार्थी करण नृसिंह मूर्ती याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी वेर्णा पोलिसांनी टँकरचालक पेद्रो मेडेरा याच्याविरोधात गुन्हा नोंद करून त्याला अटक केली. नंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. या अपघातामुळे परिसरातील वाहतूक व्यवस्था पुन्हा चर्चेत आली आहे.

बिट्स पिलानीमध्ये जीवशास्त्र विषयात पीएचडी करणारे करण मूर्ती (२५) व सोहन अधिकारी (२६) हे दोघे शनिवारी (ता. २८) सायंकाळी दुचाकीने बिर्ला-वेर्णा चौकाकडे निघाले होते. यावेळी मूर्ती दुचाकी चालवत होता.

ते बिट्स पिलानीपासून काही अंतरावर असलेल्या झुआरी इंडियन ऑयल टँकिंग प्रा. लि. समोरील रस्त्यावर पोहोचले असता, दुचाकी इंधनवाहू टँकराच्या डाव्या बाजूच्या मागील टायरावर धडकली. या अपघातात दोघेही जखमी झाले. त्यांना उपचारासाठी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान मूर्ती यांचा मृत्यू झाला. तर सोहन अधिकारी याला पुढील उपचारासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात हलविण्यात आले आहे.

Goa Accident Death
‘बनाना राईड’ ठरली अखेरची! तोल जाऊन महिला पर्यटक पडली पाण्यात, हणजूण समुद्रकिनारी हृदयद्रावक घटना

दरम्यान, यापूर्वी बिर्ला चौकात यापूर्वी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आला होता. तो टँकर आल्यावर रस्त्याकडेला उभा राहून चालकांना येणाऱ्या वाहनांबाबत सूचना देत असे. त्यामुळे टँकरचालक सावधगिरी बाळगत होते. अशा प्रकारचे अपघात टाळण्यासाठी येथे वाहतूक सुरक्षेसंदर्भात अधिक खबरदारी घेण्याची गरज व्यक्त होत आहे.

Goa Accident Death
‘बनाना राईड’ ठरली अखेरची! तोल जाऊन महिला पर्यटक पडली पाण्यात, हणजूण समुद्रकिनारी हृदयद्रावक घटना

दुर्लक्षामुळे बळी

टँकरचालक बिर्ला-वेर्णा चौकातून झुआरी इंडियन ऑयल टँकिंगसमोरील रस्त्यावर आला असता, कंपनीच्या आवारात प्रवेश करण्यासाठी त्याने उजवीकडे वळण घेतले. दुभाजकाच्या दुसऱ्या बाजूच्या लेनमध्ये जाण्यापूर्वी वाहतुकीचे निरीक्षण करणे आवश्यक होते. मात्र, कोणतीही खबरदारी न घेता थेट उजवीकडे वळण घेतल्याने दुचाकी टँकराच्या डाव्या बाजूच्या मागील टायरावर धडकली आणि या अपघातात मूर्ती यांचा मृत्यू झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com