Human-Wildlife Conflict:दाबोळी-शिरोड्यात वाढली गव्यांची दहशत, स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण; वन खात्याकडे बंदोबस्त करण्याची होतेय मागणी

Bison menace in Shiroda: दाबोळी-शिरोडा येथील बागायतीत आणि रानात गेल्या दोन महिन्यांपासून गव्यांच्या कळपाने हैदोस घातला असून नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
Goa Bison news
Goa Bison newsDainik Gomantak
Published on
Updated on

शिरोडा: दाबोळी-शिरोडा येथील बागायतीत आणि रानात गेल्या दोन महिन्यांपासून गव्यांच्या कळपाने हैदोस घातला असून नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

गव्यांनी मांडला उच्छाद

शिरोडा पंचायत क्षेत्रातील दाबोली-शिरोडा येथील गजानन नाईक यांच्या कुळागरात आणि शेजारच्या रानात मे महिन्यापासून चार गव्यांनी उच्छाद मांडला आहे. या गव्यांनी कुळागरातील झाडांची व रोपट्यांची नासधूस केली. हे गवे या भागात मुक्तपणे फिरु लागल्याने काजू, कोकम, आंबे, फणस तसेच रानमेव्यास जाणाऱ्यांना कुळागरात आणि रानात फिरणे धोक्याचे झाले होते.

Goa Bison news
Shiroda Murder Case: पत्नीच्या खून प्रकरणी आरोपी चेतन गावकरला मोठा दणका, 'एलडीसी' पदावरुन निलंबित; दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

गजानन नाईक यांच्या बागायतीत काम करणाऱ्या बिगर गोमंतकीय कामगारांनी गव्यांच्या भीतीमुळे आपल्या घरी परतणे पसंत केले. पावसाळा सुरु झाल्यापासून या चार गव्यांपैकी दोन गवे या कुळागरात फिरताना दिसतात, असे गजानन नाईक यांनी ‘गोमन्तक’शी बोलताना सांगितले. वन खात्याने या गव्यांचा बंदोबस्त करुन कुळागर आणि रानात जाणाऱ्या नागरिकांच्या मनातील भीती दूर करावी, अशी मागणी होत आहे.

Goa Bison news
Shiroda Murder Case: पत्नीच्या खून प्रकरणी आरोपी चेतन गावकरला मोठा दणका, 'एलडीसी' पदावरुन निलंबित; दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

बिबट्याची दहशत

दुसरीकडे, गेल्या दहा-बारा दिवसांपासून डिचोलीतील (Bicholim) लामगाव परिसरात भर लोकवस्तीत बिबट्याची दहशत वाढली आहे. लोकवस्तीत घुसून दोन पाळीव मिळून आतापर्यंत पाच कुत्र्यांना (श्वान) या बिबट्याने फस्त केल्याची माहिती मिळाली. हा बिबट्या लोकवस्तीजवळ संचार करत असताना अनेकांच्या नजरेला पडला. भर लोकवस्तीत बिबट्याचा वावर वाढल्याने लामगाव परिसरातील लोक भयभीत झाले आहेत. बिबट्याच्या संचारामुळे तर काहीजण सायंकाळनंतर तर घराबाहेर पाडण्याचे धाडस करत नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com