Savoi Verem: घाणो, सावईवेरेत गव्याचा फेरफटका! नागरिकांत भीतीचे वातावरण; पहा Video

Bison in Goa: सावईवेरे हा गाव कुळागरी व बागायतींनी नटलेला असल्याने कुळागरी पीक हेच काही लोकांचे उदरनिर्वाहाचे साधन आहे. घाणो कुळागरात एक गवा फेरफटका मारताना लोकांच्या दृष्टीस पडला.
Bison in Goa, Gaur In Goa
Bison Sighting GoaDainik Gomantak
Published on
Updated on

सावईवेरे: वेरे - वाघुर्मे ग्रामपंचायत क्षेत्रातील घाणो, सावई, शिलवाडा या भागात गव्याचा मुक्त संचार बराच वाढला आहे. आज घाणो भागातील कुळागरात एक गवा चक्क फेरफटका मारताना लोकांच्या दृष्टीस पडला.

सदर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या भागात गव्यांचा मुक्त संचार असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. या भागातील बागायतदारांनी काबाडकष्ट करून लागवड केलेल्या पिकांची वारंवार गव्यांकडून नासधूस केली जाते.

Leopard Bison Sighting In Goa
Wildlife Conflict UsgaoCanva

त्यामुळे बागायतदारांना नुकसान सोसावे लागत आहे. सावईवेरे हा गाव कुळागरी व बागायतींनी नटलेला असल्याने कुळागरी पीक हेच काही लोकांचे उदरनिर्वाहाचे साधन आहे.

Bison in Goa, Gaur In Goa
Bison Sighting: लाखेरेत गव्यांची वाढती दहशत! नागरिकांत घबराट; बंदोबस्त करण्याची मागणी

शिलवाडा येथील बागायतदार अभिजीत शिलकर यांनी सांगितले की, शिलवाडा हा प्रामुख्याने डोंगराळ भाग असल्याने अननस उत्पादनात अग्रेसर व एकूणच कुळागरी भाग. मागील काही काळ पाहता वानरांचा वावर असे. परंतु कालांतराने रानटी जनावरे डोंगराळ भागातून कुळागरात व अननसाच्या बागेत प्रवेश करू लागल्याने त्यात पिकाची नासधूस होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com