रात्री कामावरून घरी जाताना दुचाकीस्वाराच्या मागे लागला 'गवा'! पाळी - सुर्ल येथे स्थानिक भयभीत

Pali Surla: पाळीतील तळेमाथा तसेच सुर्ल परिसरातील वागूस भागात हा गवा अनेकांना दिसल्यामुळे या गव्याचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे
Pali Surla: पाळीतील तळेमाथा तसेच सुर्ल परिसरातील वागूस भागात हा गवा अनेकांना दिसल्यामुळे या गव्याचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे
Indian Bison At GoaCanva
Published on
Updated on

Goa Pali Surla Bison News

पाळी: पाळी - सुर्ल भागात सध्या एका भल्या मोठ्या पूर्ण वाढ झालेल्या गव्याचा संचार असल्याने स्थानिक भयभीत झाले आहेत. मुख्य म्हणजे पाळीतील तळेमाथा तसेच सुर्ल परिसरातील वागूस भागात हा गवा अनेकांना दिसल्यामुळे या गव्याचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.

पाळी - सुर्ल भाग हा खाणव्याप्त भाग असून या भागात खाणींचा उद्योग मोठ्या प्रमाणात सुरू होता, पण खाणी बंद झाल्यानंतर या भागात केवळ लीलावाच्या खनिज मालाची तेवढी वाहतूक करण्यात आली. खाणी बंद झाल्यामुळे या भागात धडाडणारी अवजड वाहने तसेच यंत्रे बंद पडल्याने आता या परिसरात शुकशुकाट पसरलेला असतो. नेमका याच संधीचा फायदा घेत अनेक रानटी जनावरे पाळी - सुर्ल भागात संचार करीत असून मागच्या काळात तर या भागात बिबट्या दिसला होता, तसेच तळे भागात एका बिबट्याचा (Leopard) बंदोबस्तही करण्यात आला होता.

आता गव्याचा मुक्त संचार या भागात सुरू असल्याने परिसरात एकट्या दुकट्या जाणाऱ्यांकडून भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे तळेमाथा येथील ज्या ठिकाणी मुले क्रिकेट खेळतात, त्या क्रीडांगणावरही हा गवा दिसल्याने विद्यार्थ्यांत भीतीची छाया पसरली आहे. वन खात्याने या गव्याचा त्वरित बंदोबस्त करून लोकांना भयमुक्त करावे, अशी जोरदार मागणी पाळी व सुर्ल भागातील नागरिकांनी केली आहे.

दुचाकीस्वाराच्या मागे लागला गवा!

दोन दिवसांपूर्वी वागूस - सुर्ल येथे रात्रीच्या वेळेला कामावरून सुटून घरी परतणाऱ्या एका दुचाकीस्वाराच्या मागे हा गवा लागल्याने दुचाकीस्वाराला पळता भुई थोडी झाली. रात्रीच्या वेळी रस्ता निर्मनुष्य असल्याने कुणाचे सहाय्यही या दुचाकीस्वाराला घेता आले नाही, पण पाचावर धारण बसलेल्या या दुचाकीस्वाराने आपला जीव वाचवण्यासाठी दुचाकी जोरात हाकली. त्यानंतर ही हकिकत त्याने इतरांना सांगितली.

Pali Surla: पाळीतील तळेमाथा तसेच सुर्ल परिसरातील वागूस भागात हा गवा अनेकांना दिसल्यामुळे या गव्याचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे
Goa Bison Attack: गव्याच्या धडकेत सुळकर्णे पिर्ला येथील तरूणाचा दुर्दैवी मृत्यू; रात्री कामावरून घरी परतताना घटना

खाण भागात रानटी जनावरे...

एक काळ होता ज्यावेळेला पाळी - सुर्ल भागात ट्रकांची तसेच अवजड यंत्रांची कायम धडधड सुरू असायची. त्यामुळे परिसरात रानटी जनावरे फिरकत नव्हती. पण आता खाणी बंद झाल्यामुळे गव्या रेड्यांबरोबरच इतर रानटी जनावरेही लोकवस्तीच्या ठिकाणी येऊ लागल्याने लोकांत भीतीची छाया पसरली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com