Tragic Death: हृदयद्रावक! रंगकाम करताना लागला विजेचा धक्का; बिर्ला येथे एकाचा अपघाती मृत्यू

Birla Tragic Death: बिर्ला परिसरात रंगकाम करताना विजेचा धक्का बसून गंभीर जखमी झालेल्या राम बाबू बिंद (वय ३५) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
High voltage electrocution incident
High voltage electrocution incidentDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: बिर्ला परिसरात रंगकाम करताना विजेचा धक्का बसून गंभीर जखमी झालेल्या राम बाबू बिंद (वय ३५) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून वेर्णा पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राम बिंद हे बायणा येथील रहिवासी असून ते व्यावसायिक पेंटर म्हणून काम करत होते. १७ मार्च रोजी ते बिर्ला-झुआरीनगर परिसरातील एका घराच्या गच्चीवर रंगकाम करत होते. उंचावर पोहोचण्यासाठी त्यांनी अ‍ॅल्युमिनियमच्या दांड्याला रंगाचा रोलर लावून काम सुरू केले होते.

High voltage electrocution incident
Mapusa Holi Violence: म्हापशात होळीच्या उत्साहाला गालबोट, हाणामारीत एक गंभीर जखमी; संशयितांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

काम सुरू असताना हा अ‍ॅल्युमिनियमचा दांडा चुकून जवळून जाणाऱ्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीच्या संपर्कात आला. त्यामुळे राम बिंद यांना विजेचा तीव्र धक्का बसला आणि ते गंभीर जखमी झाले. घटनेनंतर त्यांना तातडीने गोवा वैद्यकीय महाविद्यालय (गोमेकॉ) येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

High voltage electrocution incident
लग्नाला गेले कुटुंब अन् एकटी मुलगी, खिडकीचे ग्रिल कापताना चोरट्यांना रंगेहाथ पकडले; पर्रा येथे दरोड्याचा मोठा डाव फसला

या प्रकरणी वेर्णा पोलिसांनी पंचनामा करून अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, अशा प्रकारच्या अपघातांपासून बचाव करण्यासाठी बांधकामस्थळी काम करताना आवश्यक ती सुरक्षितता पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com