पक्षी, कॅमेरा आणि आनंद

पक्षी छायाचित्रण ही खरोखर फार अद्भुत प्रकारची कला आहे पण तितकीच ती आव्हानात्मकही आहे.
birds
birdsDainik Gomantak
Published on
Updated on

पक्षी, कॅमेरा आणि आनंद

पक्षी छायाचित्रण ही खरोखर फार अद्भुत प्रकारची कला आहे पण तितकीच ती आव्हानात्मकही आहे.

Birds, cameras and joy

पक्षी छायाचित्रण ही खरोखर फार अद्भुत प्रकारची कला आहे पण तितकीच ती आव्हानात्मकही आहे. यात एक्सपोजर, प्रकाश, स्पष्टता आणि पार्श्वभूमी या साऱ्याच गोष्टी अंतर्भूत असतात.

छायाचित्रणाचा छंद स्वतःला जडवून घेताच माझा निसर्गाशी संवाद अधिकच साधला जाऊ लागला. पक्षांचे स्वर, त्यांचे रंग याकडे अधिक लक्ष, आपोआपच जाऊ लागले. पक्षांचे ‘किलबीलणे’ हे मनाला स्वास्थ्य देणारे संगीतच जणू असते. फक्त पक्षीच नव्हे तर ज्या ज्यावर येऊन पक्षी बसतात आणि आपले सौंदर्य मिरवतात ती झाडे आणि फुलेही माझ्या एकचित्त निरीक्षणाचा भाग बनू लागली.

birds
गुळे ते पोळे दरम्यानच्या रस्त्याचे डांबरीकरण सुरू

पक्षी ज्या अपरिमित कष्टाने आपली घरटी बांधतात ते न्याहाळणे फार मनोवेधक असते. एकदा एक पक्षी आपले घरटे बांधत , मी सबंध दिवस ते पहात तिथे बसून राहिले होते. त्यांचे कष्ट पाहताना मनाला एक प्रकारच सकारात्मक हुरूपही येत होता.

या मोसमात गोव्यात मी विविध प्रकारचे पक्षी पाहिले. हॉर्नबिल, जंगल मैना, सुतार पक्षी आदी. कोकीळ पक्षाचे माझ्या हृदयातील स्थान फार विशेष आहे. झाडांच्या पर्णहीन फांदीवर बसून जेव्हा तो गाणे सादर करतो तेव्हा माझ्या चेहऱ्यावर हास्य ठरलेले असते. मोर आपल्या कॅमेऱ्यात छायाचित्रीत करणे ही गोष्टदेखील मनाला आनंदित करणारी असते. तो जेव्हा आपला पिसारा उघडून नाचायला सुरुवात करतो तेव्हा तो जणू सांगत असतो की जीवनाच्या प्रत्येक क्षणांचा आनंद घ्या आणि रुबाबदारपणे जगा.

birds
देवस्थान समिती निवडीत काणकोणबाबत दुजाभाव

या पक्षांचे निरीक्षण करता करता मी त्यांना घासही भरवायला शिकले. मी माझ्या सोबत वेगवेगळ्या बिया घेऊन जायची. इटुकल्या घासासाठी पक्षांचे माझ्या नजीक येणे मला फार आवडायचे. अशातऱ्हेने मला वाटायचे की मी त्यांच्याशी जोडली जात आहे. हा शोध होता आणि ते नवे शिकणेही होते. मी पक्ष्यांची छायाचित्रे घेतल्यानंतर माझा उरलेला दिवस त्या पक्ष्यांची माहिती मिळवत सरायचा आणि त्यांच्याबद्दल मला अधिक जाण यायची.

पक्षी हा निसर्गाने आम्हाला प्रदान केलेला चैतन्यपूर्ण आणि बुद्धिमान असा आविष्कार आहे त्यांना कॅमेऱ्यात पकडणे आणि स्मृतीत अक्षय ठेवणे हे माझ्यासाठी सततचे काम असेल.

- मयंका हळर्णकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com