Bird watching Festival
Bird watching Festival

Bird Watching Festival: सहावा पक्षी उत्सव साळ येथे उत्साहात

वन विभाग आयोजित राऊंड ऑफीस इब्रामपूर येथील साळ बंधाऱ्यावर पदयात्रा काढून या उत्सवाची सुरवात करण्यात आली.
Published on

Bird Watching Festival Goa: गोवा वन विभाग आयोजित सहावा पक्षी उत्सव काल साजरा करण्यात आला. रेंज फॉरेस्ट ऑफीस, पेडणे व राऊंड ऑफीस, इब्रामपूर यांच्या समन्वयाने हा पक्षी निरीक्षण कार्यक्रम साळ बंधारा परिसरात घडवून आणला.

वन विभाग आयोजित राऊंड ऑफीस इब्रामपूर येथील साळ बंधाऱ्यावर पदयात्रा काढून या उत्सवाची सुरवात करण्यात आली. या कार्यक्रमात सातेरी विद्यामंदिर, इब्रामपूर व हळर्ण पंचक्रोशी विद्यालय, हळर्ण या माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी तसेच शिक्षकांनी सहभागी होऊन पक्षी निरीक्षणाचा आनंद घेतला.

हा कार्यक्रम सकाळी 7.30 वाजता सुरू झाला आणि सकाळी 10.30 वाजता संपवण्यात आला. जेणेकरून सकाळी पक्षी आपल्या निवासस्थानी परिसरात असतात व त्यानंतर भक्ष्यासाठी ते स्थलांतर करतात. त्यामुळे या वेळेतच या पक्षांचे निरीक्षण करणे महत्त्वपूर्ण होते हे जाणून साळ बंधारा परिसराच्या पाणलोट परिसराची निवड केली होती.

Bird watching Festival
Solar Ferry Boat: अवघ्या 20 मिनिटांत चोडणहून पोहोचणार राजधानीत; सोलर पॉवर फेरीबोट सेवा सुरु

हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी राऊंड फॉरेस्ट ऑफिसर देविदास खरपालकर, वनरक्षक, वन्यजीव रक्षक, वन कर्मचारी वर्ग तसेच वाहनचालक यांचा मोठा सहभाग होता तसेच निसर्गप्रेमींनीही या कार्यक्रमात सहभागी झाले होते. विराज पवार यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com