Accident In Bilaspur: गुरांना वाचवताना कार उलटली; गोव्याला लग्नासाठी निघालेल्या महिलेचा दुर्देवी मृत्यू

Accident In Bilaspur: गोव्याला (Goa) लग्नासाठी निघालेल्या एका महिलेचा कार अपघातात जागीच मृत्यू झाला.
Accident In Bilaspur
Accident In BilaspurDainik Gomantak

Accident In Bilaspur: गोव्याला (Goa) लग्नासाठी निघालेल्या एका महिलेचा कार अपघातात जागीच मृत्यू झाला. भोजपुरी ओव्हरब्रिजवर गुरांना वाचवत असताना भरधाव वेगात असलेल्या कारचे नियंत्रण सुटून ती रेलिंगला धडकली. यानंतर कार उलटली. या अपघातात (Accident) कार चालवणाऱ्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) मृतदेह ताब्यात घेऊन पीएमसाठी पाठवला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.

तिफराच्या आर्य कॉलनीत राहणाऱ्या प्रांजल खरे यांनी अपघाताची फिर्याद दिली आहे. त्यांनी पोलिसांना सांगितले की, त्यांची मावशी सविता श्रीवास्तव (55) एका नातेवाईकाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी गोव्याला जात होती.

Accident In Bilaspur
Margoa News: पोटात अन्नाचा एकही कण नाही, उपाशी राहिल्यानेच मडगावात सख्ख्या भावांचा मृत्यू

दरम्यान, त्यांची फ्लाइट रायपूरहून होती. बुधवारी सकाळी त्या आपल्या मुली प्रियंशा श्रीवास्तव आणि भारती खरे यांच्यासोबत रायपूरला फ्लाइट पकडण्यासाठी जात होत्या. भोजपुरी टोल प्लाझासमोरील ओव्हरब्रिजवर अचानक त्यांच्या गाडीसमोर गुरे आली.

गुरांना वाचवण्याचा प्रयत्न करत असताना भरधाव वेगात असलेल्या कारचे नियंत्रण सुटले आणि ती रेलिंगला धडकली. या अपघातात सविता यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पीएमसाठी पाठवला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com