Bike Accident : काम्पालमध्ये दुचाकीचा भीषण अपघात

अपघातात दुचाकीचालक गंभीर जखमी; उपचार सुरु
bike accident in campal
bike accident in campal Dainik Gomantak
Published on
Updated on

Bike Accident : काम्पालमध्ये दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. मंगळवारी सकाळी हा अपघात झाला. या अपघातात दुचाकीचालक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

पणजीतून मिरामारच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर काम्पाल येथे मंगळवारी सकाळी दुचाकीचा भीषण अपघात पाहायला मिळाला. GA03 S4216 क्रमांकाची दुचाकी झाडावर धडकून अपघात झाला. यात दुचाकीच्या दर्शनी भागाचं मोठं नुकसान झालं असून दुचाकीस्वारही गंभीर जखमी झाला आहे.

bike accident in campal
Accident: संजीवनी साखर कारखान्याजवळ अपघात: एक ठार

दरम्यान धारबांदोडा येथे असणाऱ्या संजीवनी साखर कारखान्याजवळ चारचाकी कार आणि कंटेनर यांच्यात अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार साखर कारखान्यानजिक एका कार आणि कंटेनर यांची समोरासमोर धडक झाली. या धडकेत कारमधील तीघे गंभीर जखमी झाले आहेत. यापैकी एकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com