साट्रेत जंगलातील डोंगर कोसळला, पुर्वी होते आंब्याचे गवळ गाव...!

म्हादई नदीला मोठा पुर येऊन जनजीवन विस्कळीत झाले होते. त्याच दरम्यान सत्तरी तालुक्यात डोंगर कोसळण्याच्या घटना समोर येत आहेत.
साट्रेत जंगलातील डोंगर कोसळला,
साट्रेत जंगलातील डोंगर कोसळला,Dainik Gomantak
Published on
Updated on

वाळपई: सत्तरी तालुक्यात जुलै महिन्याच्या तिसर्या आठवड्यात संततधार मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नहापुर येऊन घरांची पडझड, बागायतींची नुकसानी झाली होती. म्हादई नदीला मोठा पुर येऊन जनजीवन विस्कळीत झाले होते. त्याच दरम्यान सत्तरी तालुक्यात डोंगर कोसळण्याच्या घटना समोर येत आहेत. सुरुवातील करंझोळ, कुमठळ, झर्मे, माळोली अशा बर्याचशा गावात डोंगरावरील माती मोठ्या प्रमाणावर वाहून येण्याच्या घटना समोर आलेल्या आहेत. आता साट्रे गावच्या जंगलातील डोंगर कोसळून मोठ्या प्रमाणावर माती वाहून येऊन जवळपास अडीच किलो मीटर भागात मातीचा थर जमा झाला आहे. (Big Hill collapsed in Satre forest Goa)

साट्रे गावच्या सीमेतील कर्नाटकाच्या पारवड गावच्या वाटेवर माडाचो खडू लावकेकडे येथून शिधीची कोंड असा भाग साधारण 2.5 ते 3 किलो मीटर लांब, सुमारे 100 मीटर रुंद डोंगराची दरड कोसळली आहे अशी माहीती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. त्यामुळे सत्तरी तालुक्यात या कोसळेल्या डोंगराच्या भागामुळे नागरिकातही आश्चर्य कारक कुतुहल निर्माण झाले आहे. यामागे मानवच कारणीभुत आहे असे दिसून येते. मोठ्या प्रमाणावर होणारी जंगलातील झाडांची कत्तल व त्यामुळे डोंगराच्या उतारीच्या भागातील मातीची होणारी धुप याला प्रमुख कारण आहे. केरीचे पर्यावरण तद्नय श्री. राजेंद्र केरकर म्हणाले गोवा हा पश्चीम घाटाने व्यापलेला आहे. विशेष करुन सत्तरीत डोंगरांची रचना आहे. व या निसर्गरम्य डोंगरावर मोठ मोठ्या झाडांची निर्मीती आहे. सत्तरी पर्यावरणाच्या बाबतीत संवेदनशील आहे. यावर्षी पुराचा मोठा फटका लोकांना बसलेला आहे.

साट्रेत जंगलातील डोंगर कोसळला,
Goa : ऑनलाईन शिक्षणाचा वनवास

सत्तेवर आलेल्या सरकारांनी पुरप्रवण भागात उपाय योजना हाती घेतलेल्या नाहीत. डोंगरावरील वृक्ष वेलींची लागवड, झाडांचे अस्तित्व अबाधित राहण्यासाठी कार्यवाही गरजेची आहे. नाहीतर अशा घटना होतच राहणार आहेत. नदीतील चोख व्यवस्थापन झाले पाहिजे. मान्सुनात होणारे पुर रोखण्यासाठी निसर्गातले बदल ओळखून पुर्वतयारी करण्याची नितांत गरज आहे. आपत्ती यंत्रणेने सतत सतर्क राहिले पाहिजे. यंत्रणेतील त्रुटी सुधारल्या पाहिजेत. डोंगर कोसळण्याच्या घटना रोखण्यासाठी डोंगरावरील झाडांचे संरक्षण करणे, पुरप्रवण क्षेत्र अधिसुचित करुन संरक्षण देणे, सर्व प्रकारच्या बांधकामांना पूरप्रवण क्षेत्रात प्रतिबंध करणे, शेतीला संरक्षण देणे, वसंत बंधारे पर्यावरण स्नेही बांधकाम करणे, रेती दगडगोटे उत्खननास प्रतिबंध घालणे, नदीच्या परिसरात वनीकरण करणे अशा गोष्टींची पुर्तता झाली पाहिजे असे केरकर म्हणाले.

केरीचे पर्यावरण प्रेमी श्री. विठ्ठल शेळके म्हणाले गोमंतकातील सह्याद्रीच्या पर्वत रांगा या खरंतर गोव्याला लाभलेलं नैसर्गिक सुरक्षा कवचच आहे. परंतु आज याच डोंगरांवर अवैध वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत आहे आणि या डोंगरांचे रूपांतर भुसख्खलन होताना दिसत आहे. भारतीय मातृवृक्षांची तोड करून त्याठिकाणी काजू बागायती आणि रबर सारख्या झाडांची लागवड केल्याने डोंगर खचले जात आहेत. डोंगरावरील झाडे स्वतःच्या मुळांनी माती घट्ट पकडून ठेवण्याचे काम करतात आणि जेव्हा हेच वृक्ष जमीनदोस्त होतात तेव्हा भुसखलन होते. लोकांनी स्वतःचा गाव आणि गावचे अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी अशी वृक्षतोड थांबवणं अत्यंत गरजेचं आहे.

साट्रेत जंगलातील डोंगर कोसळला,
Goa: नेत्रावळीची आर्थिक घडी विस्कटली

या म्हादई अभयारण्याच्या क्षेत्रात जाऊन म्हादई वनविभागाच्या ट्रेकर्स यांनी कोसळलेल्या भागाची पहाणी केली आहे. त्यावेळी जवळपास दोन किलो मीटर लांब परिसर हा पूर्णपणे मातीने झाकून गेल्याचे निदर्शनास आले आहे. या भागात कोसळलेल्या भागातून आता पाण्याचे वहन होते आहे. तसेच या भागात फिरणे खुपच धोकादायक असल्याचे म्हादई वनखात्याच्या ट्रेकर्सना दिसून आले आहे. साट्रे गावच्या जंगलातील डोंगर कोसळून मोठ्या प्रमाणावर माती वाहून येऊन जवळपास अडीच किलो मीटर भागात मातीचा थर जमा झाला आहे. त्यामुळे सत्तरी तालुक्यात या कोसळेल्या डोंगराच्या भागामुळे नागरिकातही आश्चर्य कारक कुतुहल निर्माण झाले आहे. यामागे मानवच कारणीभुत आहे असे दिसून येते. मोठ्या प्रमाणावर होणारी जंगलातील झाडांची कत्तल व त्यामुळे डोंगराच्या उतारीच्या भागातील मातीची होणारी धुप याला प्रमुख कारण आहे. या भागाची स्थानिक साट्रे गावच्या लोकांनीही तिथे जाऊन ही बाब निदर्शनास आणली आहे. या कोसळलेल्या भागाच्या परिसरात अनेक वर्षापुर्वी आंब्याचे गवळ हे गाव होते. हा गाव तेथील चांदसुर्या घाटात येत होता. त्याठिकाणी लोकांची मोठी वस्ती होती.

लोक कुमेरी शेती करीत होते. या कुमेरी शेतीपायी तेथील जंगलांचा मोठ्या प्रमाणावर र्हास झाला होता. त्याचा हळुहळू परिणाम होत आता मोठ्या पावसावेळी मान्सुनचे पाणी धारण करण्याची क्षमता डोंगर उताराने लयाला गेली आहे. त्यामुळे हल्लीच पडलेल्या मुसळधार पावसामुळे भुस्खनन झाले आहे. विशेष म्हणजे पंडीत महादेव शास्त्री जोशी यांनी आपल्या आत्मपुराणात वरील आंब्याचे गवळ गावा विषयी उल्लेख केलेला आहे. दर शुक्रवारी कर्नाटकातील कणकुंबी गावच्या आठवडा बाजाराला नगरगाव पंचायत भागातील असंख लोक याच वाटेने पारवड मार्गाने कणकुंबीत बाजाराला जात होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com