Paws Animal Lovers
Paws Animal LoversDainik Gomantak

बिग डॅडी कॅसिनोतर्फे ‘पॉज’ प्राणीप्रेमी संघटनेला मदत

‘पॉज’ संस्थेला बिग डॅडी कॅसिनोतर्फे धनादेश देण्यात आली
Published on

पणजी: प्राणी कल्याण क्षेत्रात काम करणाऱ्या ‘पॉज’ या बिगर सरकारी संस्थेला बिग डॅडी कॅसिनोतर्फे 11,72,800 रुपयांची देणगी नुकतीच मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आली. या देणगीसाठी बिग डॅडी कॅसिनोचे व्यवस्थापकीय संचालक लाखराम गोयल यांनी पुढाकार घेतला.

या देणगीचा धनादेश बिग डॅडी कॅसिनोचे संचालक पुनीत नारंग यांच्या हस्ते संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडे प्रदान करण्यात आला.

Paws Animal Lovers
पणजी बसस्थानकात होणार दुचाकी पार्किंगची सोय

यावेळी पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात, जेनिफर मोन्सेरात व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. पॉज संस्थेतर्फे मांजर, कुत्री यांची सुटका करणे, त्यांच्यावर उपचार करणे, निर्बिजीकरण, रॅबिजविरोधी लसीकरण आदी सेवाकार्य केले जाते. या देणगीमुळे या संस्थेला आवश्‍यक साधनसुविधांवर निधीचा वापर करता आला, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. या निधीचा वापर संस्थेच्या कार्यलयाच्या नूतनीकरणासाठी व स्टरलायजेशन शेडसाठी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com