Sattari News : सत्तरीच्या विकासात भाजपचे मोठे योगदान : विश्वजीत राणे

Sattari News : वाळपई व पर्येत लोकसभा निवडणूक प्रचार सुरू
Sattari
SattariDainik Gomantak
Published on
Updated on

Sattari News :

वाळपई, सत्तरीच्या सर्वांगीण विकासात भाजप सरकारचा मोठे योगदान असून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आजपर्यंत राज्याच्या विकासाबरोबर सत्तरीचा विकास झालेला आहे.

आज पर्ये व वाळपई मतदारसंघात मोठ मोठे प्रकल्प उदयास येत आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत सत्तरीतून मोदी सरकारचा हात बळकट करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी केले. वाळपई व पर्ये मतदारसंघाच्या कार्यकर्ता बैठकीत ते मार्गदर्शन करत होते.

Sattari
Goa Weather Update: तापमानाचा पारा 33.6 अंशांवर, उकाडा वाढला

यावेळी त्यांच्यासोबत पर्येच्या आमदार डाॅ. दिव्या राणे, जिल्हा पंचायत सदस्य देवयानी गावस, विनोद शिंदे, शिवदास माडकर, दीक्षा गावस, सोमनाथ काळे, आत्माराम शेट्ये, देवानंद परब, उदयसिंग राणे, रती गावकर उपस्थित होत्या.

विश्वजित राणे पुढे म्हणाले, की सत्तरीचा विकास हा असाच होत नाही, त्यासाठी नियोजन करावे लागते. पायाभूत सुविधांबरोबरच सर्वांगीण विकासात रोजगारसुध्दा तेवढाच गरजेचा आहे. त्यासाठी मोदी सरकारचे पूर्ण सहकार्य मिळत आहे.

रोजगारावर भर’

आपल्याकडे सत्तरीबरोबरच संपूर्ण राज्यात प्रचाराची जबाबदारी दिली आहे. केंद्र सरकारने एवढी मोठी जबाबदारी आपल्यावर सोपवली आहे. त्यामुळे आता भाजप उमेदवाराला निवडून आणणे हे सत्तरीतील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.

गेल्या दोन वर्षात पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न होता. आता येणाऱ्या तीन वर्षांत रोजगारावर भर दिली जाणार आहे, असे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com