वास्को, सावर्डे रेल्वे स्थानकांचा होणार विकास; दक्षिणेत मोदींच्या हस्ते 155.37 कोटींच्या कामांचे उद्घाटन

Railway Projects In South Goa: पंतप्रधान मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दोन हजार रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्पांची पायाभरणी केली.
Railway Projects In South Goa
Railway Projects In South GoaDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Railway Projects In South Goa

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (दि.26) देशातील 41 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन केले. पंतप्रधान मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दोन हजार रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्पांची पायाभरणी केली.

यामध्ये 500 हून अधिक रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचा समावेश आहे. पीएम मोदींनी 300 हून अधिक जिल्ह्यांतील 550 हून अधिक रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी केली. यात दक्षिण गोव्यातील रेल्वे स्थानकांचा देखील समावेश आहे.

सरकारचा तिसरा कार्यकाळाला जूनमध्ये सुरुवात होईल. पंतप्रधान मोदींनी अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत 553 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास सुरू केला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

Railway Projects In South Goa
Mumbai Goa Highway RTI: काम अपूर्ण, खर्च दुप्पट; मुंबई - गोवा महामार्गावर 12 वर्षात 7,300 कोटी खर्च

अमृत भारत स्थानक योजना अंतर्गत वास्को आणि सावर्डे रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास केला जाणार आहे.

कुडतरी अंडरपास, काले ओव्हरपास, धडे अंडरपास, नेसाय येथील कामाची पायाभरणी यासह इतर कामांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करण्यात आले.

नूतनीकरण होत असलेली रेल्वे स्थानकं स्थानिक संस्कृती आणि कलेचा विस्तार करतात. पंतप्रधान मोदींनी आज 1500 हून अधिक रस्ते, ओव्हरपास आणि अंडरपास प्रकल्पांची पायाभरणी केली.

यामध्ये यूपीमधील 252, महाराष्ट्रातील 175, तामिळनाडूमधील 115 प्रकल्पांचा समावेश आहे. यूपीची राजधानी लखनऊच्या गोमती नगरमध्ये पंतप्रधान मोदींनी रेल्वे स्टेशनचे उद्घाटन केले. या रेल्वे स्थानकाचा 377.47 कोटी रुपये खर्चून पुनर्विकास करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Konkan Railway Doubling project
PM Narendra Modi Birthday Wishes Times Square Billboard
PM Modi Digital India New Chapter
Sudhanshu Trivedi Slams P Chidambaram Dimagi Naxal
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com