Mopa Airport: ओळखपत्रांची नाही गरज; ‘मोपा’वर आता प्रवाशांना फक्त ३ सेकंदांत प्रवेश

Mopa Airport: या ॲपमुळे आता प्रवाशाला या ओळखपत्रांच्या प्रती स्वतः जवळ बाळगणे आवश्यक राहिलेले नाही.
Mopa Airport
Mopa AirportDainik Gomantak
Published on
Updated on

Digi Yatra At Mopa Airport

कोणतेही ओळखपत्र स्वतःजवळ न बाळगता केवळ तीन सेकंदात मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवेश करणे आता शक्य होणार आहे. ‘डिजी यात्रा’ हे ॲप प्रवाशाने आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करून ही सुविधा घेता येते. बुधवारी विमानतळावर या सुविधेला प्रारंभ करण्‍यात आल.

विमान प्रवासासाठी विमानतळावर जाणाऱ्या प्रवाशाला सरकारी ओळखपत्राच्या आधारे तिकीट काढलेली व्यक्ती ही आपणच असल्‍याची तेथील ओळख सुरक्षा कर्मचाऱ्यांकडे पटवावी लागत असे. बहुतांशपणे आधारकार्ड आणि त्याखालोखाल पासपोर्टचा वापर यासाठी केला जात असे.

या ॲपमुळे आता प्रवाशाला या ओळखपत्रांच्या प्रती स्वतः जवळ बाळगणे आवश्यक राहिलेले नाही. प्रवाशाचा चेहरा हाच विमानतळावर जाण्यासाठीचा पास ठरला आहे. शिवाय बायोमेट्रिक पद्धतीनेही प्रवाशाची ओळख पटवणे सुकर झाले आहे. यामुळे विमान प्रवासासाठी बरेच आधी विमानतळावर पोचणे आवश्यक राहिलेले नाही. आता विमानतळावर जाण्यासाठी जास्तीत जास्त ३ सेकंद लागू शकतात.

Mopa Airport
Shripad Naik North Goa: गाव वाचवा मगच प्रचाराला या! श्रीपाद नाईक यांना मुळगावात घेरले!

यामुळे फ्लाईट बोर्डिंग प्रक्रिया लक्षणीय जलद आणि अखंड बनली आहे. कारण प्रत्येक प्रवाशाला येथे फक्त ३ सेकंदांपेक्षा कमी वेळ लागतो. हे तंत्रज्ञान एअरलाईन्स डिपार्चर कंट्रोल सिस्टीममध्ये देखील समाकलित केले आहे. त्यामुळे केवळ प्रमाणीकृत केलेल्या प्रवाशांनाच टर्मिनलमध्ये प्रवेश करण्याची परवानगी मिळते.

प्रवाशांचा चेहराच बोर्डिंग पास

केंद्रीय नागरी हवाई उड्डाण मंत्रालय आणि डिजी यात्रा फाऊंडेशनने हे ॲप तयार केले आहे. ते वापरणाऱ्या प्रवाशाला बायोमेट्रिक सक्षम सुसह्य प्रवासाचा अनुभव मिळत आहे.

‘डिजी यात्रा’ हे ॲप चेहरा ओळखण्याची सोय करत असल्याने मुख्य तपासणी नाक्यावर प्रवाशांची संपर्करहित ओळख सक्षम करते जसे की, विमानतळ प्रवेश, सुरक्षा तपासणी आणि बोर्डिंग गेट येथेही या ॲपच्या मदतीने प्रवेश करता येतो. प्रवाशांचा चेहरा बोर्डिंग पास बनतो. त्यामुळे प्रत्यक्ष कागदपत्रांची आवश्यकता भासत नाही.

"अशी सुविधा देणाऱ्या देशातील निवडक विमानतळांमध्‍ये आता मोपा मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा समावेश झाला आहे. आमच्याकडे डिजी यात्रेसाठी तीन टच पॉईंट्स आहेत. पहिला फोरकोर्टमध्ये, दुसरा प्री-सिक्युरिटी होल्डमध्ये व तिसरे क्षेत्र बोर्डिंग गेट क्रमांक १० येथे आहे. प्रवासी या सुविधेचा वापर सर्व विमान कंपन्यांसाठी करू शकतात," असे जीएमआर कंपनीचे सीईओ आर. व्ही. शेषन म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com