Bicholim News : डिचोलीत अद्याप श्रीगणेशा बाकी; महिन्याच्या अखेरपर्यंत मान्सूनपूर्व कामे हाती घेणार

Bicholim News : नदीकाठी पूर संरक्षक भिंतीचे काम मात्र वेगाने
Bicholim
BicholimDainik Gomantak

Bicholim News :

डिचोली, पावसाळ्यात पुरासारखी घटना टाळण्यासाठी डिचोली शहरातील नदीकाठी पूर संरक्षक भिंत उभारण्यात येत असून, हे काम सध्या जोरात सुरू आहे.

दुसऱ्या बाजूने पालिकेतर्फे अद्याप शहरात मान्सूनपूर्व कामांना चालना देण्यात आलेली नाही. गटार उपसणे, नाल्यांची साफसफाई आदी कामे प्रतीक्षेत आहेत. चालू महिन्याच्या अखेरपर्यंत मान्सूनपूर्व कामे हाती घेण्यात येणार आहेत, अशी माहिती नगराध्यक्षांकडून देण्यात आली आहे.

जोरदार पर्जन्यवृष्टी होऊन शहरातील नदी तुडुंब झाली, की ‘पिराची कोंड’ येथे पाणी बाहेर फुटून जवळपासच्या घरांमध्ये घुसते. पावसाळ्यातील हे संकट टाळण्यासाठी नदीकाठी पूर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे.

Bicholim
Goa Ex-Ranji Players In NCA: गोव्याचे माजी रणजी क्रिकेटपटू 'एनसीए'त; स्वप्नील अस्नोडकर फलंदाजी प्रशिक्षक

जलस्रोत खात्यातर्फे ७५ लाख रुपये खर्च करून नदीकाठी संरक्षक भिंत बांधण्यात येत आहे. सध्या हे काम जोरात सुरू असून, पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ही संरक्षक भिंत पूर्ण झाली की पावसाळ्यात पिराची कोंड भागातील समस्या सुटेल.

पावसाळापूर्व कामांसाठी आणखी निधीची तरतूद करावी लागणार आहे. साफसफाई कामाचे कंत्राट देण्यात येणार आहे. पावसाळा जवळ आल्याने पावसाळापूर्व कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. कामावर पालिका लक्ष ठेवणार आहे. पावसाळ्यात समस्या निर्माण होता कामा नये, त्यासाठी सर्व प्रभागांत कामे करण्यात येणार आहेत.

- पुंडलिक फळारी, नगराध्यक्ष

४ लाखांचा निधी मंजूर

पावसाळ्यातील समस्या टाळण्यासाठी पालिकेच्या चौदाही प्रभागांत गटार सफाई आदी कामे करण्यात येणार आहेत. कंत्राट पद्धतीने ही कामे करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. मान्सूनपूर्व कामे करण्यासाठी आपत्कालीन व्यवस्थापन योजनेंतर्गत पालिका प्रशासन खात्याकडून ४ लाखांचा निधी मंजूर झाल्याची माहिती मिळाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com