Bicholim News : मालेनृत्य अन् देवीचा जयघोष ; रेड्याची जत्रा उत्साहात

Bicholim News : गेल्या १६ एप्रिल रोजी ‘माल्या’ची जत्रा सुरळीतपणे साजरी झाली होती. त्यामुळे ‘रेड्या’च्या जत्रेचा मार्ग मोकळा झाला होता. काल मध्यरात्री ते आज (बुधवारी) पहाटेपर्यंत रेड्याची जत्रा साजरी झाल्यानंतर दुपारी कौलोत्सव साजरा होवून या जत्रेची उत्साहात सांगता झाली.
Bicholim
Bicholim Dainik Gomantak
Published on
Updated on

Bicholim News :

डिचोली, ‘माल्या’च्या जत्रे पाठोपाठ हजारो भाविकांच्या उपस्थितीत मये येथील श्री माया केळबाई पंचायतन देवस्थानची प्रसिद्ध ‘रेड्या’ची अर्थातच व्हडली जत्राही उत्साहात साजरी झाली. माल्याच्या जत्रेप्रमाणेच मागील तब्बल चार वर्षे ‘रेड्या’चे जत्रेत खंड पडला होता.

गेल्या १६ एप्रिल रोजी ‘माल्या’ची जत्रा सुरळीतपणे साजरी झाली होती. त्यामुळे ‘रेड्या’च्या जत्रेचा मार्ग मोकळा झाला होता. काल मध्यरात्री ते आज (बुधवारी) पहाटेपर्यंत रेड्याची जत्रा साजरी झाल्यानंतर दुपारी कौलोत्सव साजरा होवून या जत्रेची उत्साहात सांगता झाली.

चार वर्षांच्या खंडानंतर ‘रेड्या’ची जत्रा साजरी होत असल्याने मये गावात भाविकांनी गर्दी केली होती. दुकानांची फेरीही भरली होती. कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होता कामा नये. त्यासाठी पोलिसांसह केंद्रीय राखीव सुरक्षा दळाचे जवान तैनात करण्यात आले होते. मये गावात साजरी होणाऱ्या ''रेड्या''चा जत्रेला मोठा इतिहास आहे.

Bicholim
Goa Congress: पर्रीकरांनी विश्वास घातकी म्हटले त्याच गॉडमनला भाजपात प्रवेश; मोदी परिवारात देशद्रोही लोक - पाटकर

‘रेड्या’च्या जत्रेनिमित्त परंपरेप्रमाणे माशेलहून श्री देवकीकृष्ण, श्री पिसो रवळनाथ आणि श्री कुलपुरुष देवतांची तरंगे जलमार्गे होडीतून मये गावात येतात. ही तरंगे काल (मंगळवारी) सायंकाळी जलमार्गे मये गावात आली होती.

पाटो-हळदणवाडी येथे पारंपरिक ठिकाणी ही तरंगे ठेवण्यात आली होती. मध्यरात्री बोलावणे गेल्यानंतर अवसारी मोडासह ही तरंगे गावकरवाडा येथील श्री महामाया मंदिरात आल्यानंतर या तरंगांनी जत्रोत्सवात भाग घेतला. त्याठिकाणी केळबाई देवीची बंद पेठ सजविण्यात आल्यानंतर पारंपरिक विधी पार पडले. नंतर गाऱ्हाणे घालण्यात आले. मोडाच्या डोक्यावर पेटते माले आणि तरंगांचे केळबायवाडा येथील श्री केळबाई देवीच्या मंदिराजवळ आगमन झाले.

तरंगे निघाली माघारी! :

मंदिरासह व्रतस्थ धोंड भक्तगणांच्यासह, मालेनृत्य आणि देवीच्या जयघोषात जत्रा साजरी झाली. नंतर दीपोत्सव साजरा झाला. दरम्यान, कौलोत्सव साजरा करून आज सायंकाळी माशेल येथील तरंगे माघारी जाण्यासाठी मार्गस्थ झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com