Bicholim News : ‘अवकाळी’चा अनेक ठिकाणी तडाखा; वीजखांबांची मोडतोड

Bicholim News : कारापुरात कारगाडीवर झाड कोसळले; ही हानी वगळता अन्य कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती डिचोली अग्निशमन दलाकडून मिळाली.
Bicholim
BicholimDainik Gomantak

Bicholim News :

डिचोली, अवकाळी पावसाने पुन्हा एकदा तडाखा देताना सर्वत्र दाणादाण उडवली. डिचोली तालुक्यात गुरुवारी दिवसभरात पाच ठिकाणी पडझड झाली. यात वीज खांब तसेच एका कारगाडीची किरकोळ मोडतोड झाली.

ही हानी वगळता अन्य कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती डिचोली अग्निशमन दलाकडून मिळाली.

गवंडीवाडा-कारापूर येथे भर लोकवस्तीत ''आंबाड्या''चे झाड कोसळल्याने दोन वीज खांब मोडले. या घटनेत त्या ठिकाणी पार्क करून ठेवलेल्या एका कारगाडीचीही किरकोळ मोडतोड झाली. आमोणे, न्हावेली, मुळगाव आणि हाउसिंग बोर्ड-साखळी येथे रस्त्यावर झाड कोसळले.

Bicholim
Goa Crime News: समाज कल्याण खात्याचे मंत्री फळदेसाईंना धमकी, 20 कोटी खंडणीची मागणी; संशयिताला जामीन

या घटनांनी वीज खात्याचे नुकसान झाले. डिचोली अग्निशमन दलाचे लिडींग फायर फायटर राजन परब, प्रल्हाद देसाई आणि महादेव गावस यांच्या नेतृत्वाखाली जवानांच्या पथकांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मदतकार्य केले.

दरम्यान, कारापूर येथे वीजवाहिन्या तोडून दोन खांब मोडल्याने कारापुरात दिवसभर वीज प्रवाह बंद होता. वीज खात्याच्या कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीकामात हलगर्जीपणा केल्यामुळे ही समस्या उद्भवली, असा नागरिकांचा दावा होता.

Bicholim
Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा प्रवासासाठी आता तीन पर्याय; महाराष्ट्र सरकारकडून आणखी दोन महामार्गांचा प्रस्ताव

गडगडाटासह पर्जन्यवृष्टी

डिचोलीत अवकाळी पावसाने पुन्हा एकदा तडाखा दिला. सायंकाळी पावणेचार वाजण्याच्या सुमारास विजांचा लखलखाट आणि ढगांच्या गडगडाटासह जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. साधारण तासभर पाऊस पडला. नंतर मात्र पाऊस ओसरला. तासभर पडलेल्या पावसामुळे सर्वत्र दाणादाण उडताना जनजीवन विस्कळीत झाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com