Bicholim News : पिळगाव-माठवाडा रस्ता खचला, ‘अवकाळी’चा तडाखा

Bicholim News : आता अवकाळी पावसाच्या तडाख्यात हा रस्ता खचत असल्याने या रस्त्यावरील धोका वाढला असून वाहनचालकांमध्ये भीती व्यक्त होत आहे.
Bicholim
BicholimDainik Gomantak

Bicholim News :

डिचोली, अवकाळी पावसाच्या तडाख्यात पिळगाव पंचायत क्षेत्रात येणारा माठवाडा रस्ता खचला असून हा रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. सारमानस मुख्य रस्त्याला जोडून माठवाड्यावर जाणारा अंतर्गत रस्ता आधीच अरुंद आहे.

त्यातच या रस्त्यावर पावलोपावली लहानमोठी वळणेही आहेत. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीस आधीच असुरक्षित आहे.

आता अवकाळी पावसाच्या तडाख्यात हा रस्ता खचत असल्याने या रस्त्यावरील धोका वाढला असून वाहनचालकांमध्ये भीती व्यक्त होत आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी या रस्त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे. या रस्त्यावर वेळीच उपाययोजना केली नाही, तर पावसाळ्यात भयानक स्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Bicholim
Goa Fishining : गतवर्षी मासेमारी १२ टक्क्यांनी घटली; १४ हजार टनांची तूट

तशी भीतीही वाहनचालकांसह नागरिक व्यक्त करीत आहेत. अवकाळी पावसाच्या तडाख्यात माठवाडा येथे भर लोकवस्तीजवळच वळणदार उतरणीवर तर हा रस्ता मोठ्या प्रमाणात खचला आहे. तसेच श्री तळेश्वर देवस्थानजवळ आणि अन्य एका ठिकाणी हा रस्ता खचला असून, पुन्हा पावसाचा तडाखा बसल्यास ही समस्या गंभीर बनण्याचा धोका आहे.

धोकादायक वळणे कापा

माठवाडा अंतर्गत रस्ता अरुंद आणि या संपूर्ण रस्त्यावर लहानसहान वळणे आहेत. या वळणांमुळे हा रस्ता वाहतुकीस असुरक्षित बनला आहे. लहानसहान अपघातही घडत आहे. या रस्त्यावरील धोकादायक वळणे कापून रस्ता वाहतुकीस सुरक्षित करावा. रस्ता खचण्याचा धोका आहे, त्या ठिकाणी संरक्षक कठडे बांधावेत. स्थानिक पंचायतीसह आमदारांनी या समस्येत लक्ष घालावे, असे मत माजी सरपंच नीलेश जल्मी यांनी व्यक्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com