Bicholim Courthouse: डिचोलीतील पोर्तुगीजकालीन न्यायालय दुरुस्तीच्या प्रतिक्षेत ! फुटलेली कौले, धोकादायक स्लॅबमुळे दुरावस्था

Bicholim Portuguese courthouse: पोर्तुगीजकालीन आणि डिचोली शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेली सध्याची दिवाणी आणि फौजदारी न्यायालय इमारत पूर्वी ‘त्रिब्युनल’ म्हणून ओळखण्यात येत होती.
Bicholim Portuguese courthouse
Bicholim Portuguese courthouseDainik Gomantak
Published on
Updated on

Bicholim Portuguese courthouse Repair

डिचोली: शहरातील पोर्तुगीजकालीन दिवाणी आणि फौजदारी न्यायालय इमारतीचे छपर कमकुवत झाले असून इमारतीला लागलेले ‘गळती’चे ग्रहण कधी सुटणार. त्याची सर्वांना प्रतीक्षा लागून राहिली आहे. पावसाळ्यातील गळती रोखण्यासाठी गेल्या पावसाळ्यात छपरावर घालण्यात आलेले प्लास्टिकचे आच्छादन अलीकडेच काढले आहे.

आच्छादन काढल्यानंतर छपराची अवस्था स्पष्ट झाली आहे. छपरावरील काही कौले फुटल्याचे दिसून येत आहे. यंदाच्या पावसाळ्यापूर्वी तरी छपराची दुरुस्ती होईल काय? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. गेल्यावर्षी जुलै महिन्यात तर या छपराच्या स्लॅबचे तुकडे पडले होते.

पोर्तुगीजकालीन आणि डिचोली शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेली सध्याची दिवाणी आणि फौजदारी न्यायालय इमारत पूर्वी ‘त्रिब्युनल’ म्हणून ओळखण्यात येत होती. काही वर्षांपूर्वी या इमारतीची डागडुजी करण्यात आली आहे. तर मार्च २००३ मध्ये या इमारतीला जोडून विस्तारीत इमारत बांधकाम केलेले आहे.

Bicholim Portuguese courthouse
Madras High Court: सूर्यास्तानंतर महिलेला अटक का होत नाही? पोलीस मोडू शकतात कायदा, हायकोर्ट असे का म्हणाले? वाचा सविस्तर

मात्र न्यायालयाची इमारत आता काहीशी कमकुवत झाली आहे. या इमारतीच्या छपरातून पावसाचे पाणी झिरपत आहे. परिणामी वकिलांसह न्यायालयीन कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांना उपद्रव सहन करावा लागत आहे. गेली सलग तीन वर्षे या इमारतीच्या छपरावर प्लास्टिकचे आच्छादन घालण्याची पाळी आली होती.

Bicholim Portuguese courthouse
Goa Court: पाच कोटी खंडणी मागणाऱ्याला पोलिसांना 1 लाख रुपये द्यावे लागणार; आमदार अश्‍लील व्हिडिओ मॉर्फ प्रकरण

इमारत विधानसभेत

पावसाळी अधिवेशनात आमदार प्रेमेंद्र शेट यांनी लक्षवेधी सूचना मांडताना या न्यायालय इमारतीचा मुद्दा उपस्थित केला होता. सरकारने या इमारतीची स्थैर्यता तपासावी. या इमारतीची नव्याने डागडुजी करावी. आवश्यकता भासल्यास नवीन इमारत बांधावी, अशी मागणी आमदार शेट यांनी अधिवेशनात केली होती. विधानसभेत या इमारतीचा मुद्दा उपस्थित होताच, इमारतीची पाहणी करण्याचे आदेश मंत्री नीलेश काब्राल यांनी अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानंतर अधिकाऱ्यांनी न्यायालय इमारतीची पाहणीही करून जागेचे मोजमाप घेतले होते. मात्र त्यानंतर पुढे कोणत्याच हालचाली झाल्याचे आढळून आले नाही. परिणामी या इमारतीचे छप्पर कमकुवत झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com