Goa News: विजय राणे सरदेसाई यांची पुन्हा डिचोली ठाण्यात नेमणूक, कथित आरोप खोटा असल्याचे स्पष्ट

Vijay Rane Sardesai: महिला पोलिस कर्मचाऱ्याने केलेल्या तक्रारीत तथ्य न आढळल्याने डिचोली पोलिस ठाण्यात पुन्हा विजय राणे सरदेसाई यांची बदली करणे पोलिस खात्याला भाग पडले आहे.
Vijay Rane Sardesai transfer
Vijay Rane Sardesai transferDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: महिला पोलिस कर्मचाऱ्याने केलेल्या तक्रारीत तथ्य न आढळल्याने डिचोली पोलिस ठाण्यात पुन्हा विजय राणे सरदेसाई यांची बदली करणे पोलिस खात्याला भाग पडले आहे. ही तक्रार लैंगिक छळाची असावी, असा अंदाज व्यक्त करून त्याचा डांगोरा पिटवण्यात आल्याने राणे आणि कुटुंबीयांना नाहक मनस्तापास सामोरे जावे लागले होते.

खोट्या आरोपामुळे आठवड्यापूर्वी राखीव पोलिस दलात बदली झालेले राणे यामुळे व्यथित झाले होते. त्यांनी पोलिस सेवा सोडण्याचा विचारही काहीजणांना बोलून दाखवला होता. या आरोपामुळे कुटुंबीयांसमोर आपण कसे उभे राहू, अशी चिंता त्यांना भेडसावत होती. अखेर तक्रारीत तथ्य नसल्याचे पोलिस खात्याने केलेल्या चौकशीत दिसून आल्यानंतर त्यांना पुन्हा डिचोलीत बदली देण्यात आली आणि त्यांनी पदभारही स्वीकारला.

आठ दिवसांपूर्वी ऐन दिवाळीच्या तोंडावर राणे सरदेसाई यांची तडफातडफी राखीव पोलिस दलात बदली केली होती. मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात राणे यांनी डिचोली पोलिस स्थानकाचा ताबा घेतला होता. ताबा घेतल्यानंतर त्यांचा डिचोली पोलिस स्थानकावर वचक होता.

Vijay Rane Sardesai transfer
Mapusa Police Quarters: 'पोलिसच झाले बेघर'! 50 वर्षांपूर्वीचे म्हापसा पोलिस क्वार्टर्स मोडकळीस, तात्काळ दुरुस्तीची होतेय मागणी

पोलिस स्थानकाचा नावलौकिक राखण्यासाठी ते भरपूर मेहनत घेत होते. नशामुक्त भारत, स्वच्छता अभियान आदी उपक्रमही त्यांनी राबविले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ, अपहरण, लैंगिक अत्याचार आदी गुन्ह्यांचा छडा लावून संशयितांच्या मुसक्या आवळण्यात डिचोली पोलिसांना यश आले होते. मात्र, त्यांची बदली केल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली होती.

Vijay Rane Sardesai transfer
Goa Police: पोलिसांची राज्यभर नाकाबंदी मोहीम, 2972 वाहनांची तपासणी; 35 जण प्रतिबंधात्मक अटकेत

कर्तव्यदक्षता जिंकली

एक कर्तव्यदक्ष अधिकारी अशी ओळख असलेल्या राणे यांच्या बदलीनंतर अनेक तर्क-वितर्क पुढे येत होते. त्यांच्या बदलीमागे राजकारण असल्याचीही शक्यता व्यक्त करण्यात येत होती. महिला कॉन्स्टेबलचा छळ केल्याचा राणे यांच्यावर आरोप होता. याप्रकरणी खात्यांतर्गत चौकशी केली असता, त्यात तथ्य नसल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना पुन्हा मूळ स्थानी म्हणजेच डिचोली पोलिस ठाण्यात पाठवले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com