Water Shortage At Bicholim: सर्वत्र चतुर्थीचा उत्साह संचारला असतानाच, ऐन चतुर्थीत डिचोलीतील लामगाव भागात पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून लामगाव भागात पाणी टंचाई असून, नळांद्वारे पाणीपुरवठा बंद आहे.
‘चवथी’च्या पूर्वदिनी सोमवारी तर दिवसभर नळ कोरडे पडले होते. सायंकाळपर्यंत तरी ही समस्या होती. नळांद्वारे पाणीपुरवठा होत नसल्याने लोकांचे मोठे हाल झाले असून, गृहिणींना तर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
साफसफाई आदी कामेही अडकून पडली आहेत. ही समस्या अशीच राहिली, तर चतुर्थी कशी करावी. या विवंचनेत लामगाववासीय आहेत. सध्या तरी लोकांना मोठा प्रश्न पडला आहे. लामगाव भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीत जलसाठा आहे. मात्र, पाणीपुरवठा होत नाही.
पाणीपुरवठा विभागाने या समस्येची दखल घेतली असून, तांत्रिक बिघाड शोधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सोमवारी (ता.१८) दुपारपर्यंत पाण्याच्या टाकीतील बिघाड शोधण्याचे काम सुरू होते.
पावसाचे पाणी वापरण्याची वेळ
नळांना पाणी येत नसल्याने आमचे हाल झाले आहेत. पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. ज्यांना शक्य आहे, ते विहिरीवर धाव घेतात. मात्र, शक्य होत नाही त्या गृहिणींना पाण्यासाठी अश्रू गाळावे लागतात.
आंघोळ, धुणी-भांडी आदी कामांसाठी सध्या पावसाचे पाणी वापरण्याची वेळ आली आहे, अशी व्यथा आनंदी बालो, नरेंद्र गोवेकर यांनी मांडली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.