Bicholim: पं. कृष्णा माशेलकर संगीत समारोहाचे डिचोलीत आयोजन

डिचोलीतील प्रसिद्ध शास्त्रीय गायक पं. कृष्णा बाबूराव माशेलकर यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात येणारा संगीत समारोह येत्या शनिवारी (ता.7) साजरा करण्यात येणार आहे.
Music Featival
Music FeativalDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Bicholim: डिचोलीतील प्रसिद्ध शास्त्रीय गायक पं. कृष्णा बाबूराव माशेलकर यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात येणारा संगीत समारोह येत्या शनिवारी (ता.7) साजरा करण्यात येणार आहे. गोवा सरकारचे कला आणि संस्कृती खाते तसेच कला भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदच्या सहकार्याने बोर्डे येथील स्वर बहार संगीत मंडळातर्फे येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडपात हा समारोह आयोजित करण्यात आला आहे.

सायंकाळी 6 वा. प्रमुख पाहुणे तथा कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते या उद्‌घाटन करण्यात येणार आहे. यावेळी डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये आणि नगराध्यक्ष कुंदन फळारी उपस्थित राहणार आहेत.

यंदा या समारोहाचे आठवे वर्ष आहे, अशी माहिती आयोजक संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र पळ आणि स्वागताध्यक्ष रायू सावंत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संस्थेचे सचिव पांडुरंग साळकर, खजिनदार सुब्राय माशेलकर आणि रश्मी दळवी उपस्थित होते.

Music Featival
Salcete: सिकेटी पुलाला स्थानिकांचा मोठा विरोध; बांधकाममंत्री मात्र निर्णायावर ठाम

या संगीत समारोहात चिराग कट्टी (मुंबई) यांचे सतार वादन, सायली तळवलकर (मुंबई) आणि प्रवीण गावकर (गोवा) यांचे शास्त्रीय गायन होणार आहे. नम्रता नाईक आणि दीक्षिता आमोणकर यांच्या सुगम संगीताने या संगीत समारोहाला सुरवात होणार आहे. भक्ती देविदास आणि सुरक्षा नेवगी यांची हार्मोनियम जुगलबंदी होणार आहे.

दत्तू गावस व अनुष्का साळगावकर-थळी यांचे नाट्यसंगीत तर उमेश पळ यांचे अभंग गायन होणार आहे. या कलाकारांना सुविशांत बोर्डेकर, बाबूराव माशेलकर, वसीम खान, सुभाष फातर्पेकर, अमर मोपकर आणि डॉ. उदय कुलकर्णी हे साथसंगत करणार आहेत, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Bicholim
Viral Post
Goa Building Rules 2023
Goa Ganesh Immersion Safety 2026
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com