डिचोली पालिका प्रभाग फेररचना अन्यायकारक असल्याचा दावा, सुनावणीवेळी नागरिकांनी नोंदवले आक्षेप; निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे मतदारांचे लक्ष

Bicholim: डिचोली येथील पालिका प्रभाग फेररचना प्रकरणी निवडणूक आयोग आता कोणता निर्णय घेणार, याकडे मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे.
Bicholim
BicholimDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: येथील पालिका प्रभाग फेररचना प्रकरणी निवडणूक आयोग आता कोणता निर्णय घेणार, याकडे मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे.

प्रभाग फेररचनेला आक्षेप घेऊन काही मतदारांनी निवडणूक अधिकारी तसेच डिचोलीचे उपजिल्हाधिकारी शुभम नाईक यांच्याकडे अंतिम मुदतीपर्यंत लेखी हरकती दाखल केल्या होत्या. या हरकतीसंबंधी बुधवारी उपजिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी घेण्यात आली.

या सुनावणीवेळी प्रत्येकाच्या सूचना आणि हरकती उपजिल्हाधिकाऱ्यांनी ऐकून घेतल्या. हरकत घेणाऱ्या मतदारांनी प्रभागांची फेररचना अन्यायकारक असल्याचे उपजिल्हाधिकाऱ्यांना निदर्शनास आणून फेररचना मागे घ्यावी, अशी मागणी केली.

Bicholim
Goa Theft: चाकूचा धाक दाखवून बाणावलीत डॉक्टरला  लुटले, दीड लाखांचा ऐवज पळविला

भौगोलिक रचना विचारात घेऊन प्रभाग फेररचना करण्यात आली आहे, असे सांगितले जात असले तरी, फेररचना अन्यायकारक आहे. या फेररचनेमुळे सोनारपेठ भाग विकासाच्या बाबतीत दुर्लक्षित राहणार, तसेच भविष्यात वाद निर्माण होण्याची भीती आहे, असे सोनारपेठ येथील ऍड. विभूती कामत, उल्हास चोडणकर, समृद्ध चोडणकर यांनी व्यक्त केले.

Bicholim
Goa Accident Death: 98 दिवसांत 66 जणांचे बळी, दर तिसऱ्या दिवशी एक मृत्यू; 80 टक्के अपघातांत दुचाकी

पालिका प्रशासनाच्या २०२१ च्या अधिसुचनेनुसार प्रभाग फेररचना करण्यात आलेली नाही; उलट चुकीच्या पद्धतीने केली आहे, असे मत समीर वायंगणकर आणि नारायण बेतकीकर यांनी व्यक्त केले. सुनावणीवेळी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या केबिनबाहेर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com