Kudchire: भलामोठा, 200 वर्षांचा जुनाट वृक्ष धोक्यात; जोरदार पावसामुळे व्हावटी-कुडचिरे येथे कोसळली दरड

Kudchire Landslide: जोरदार पावसामुळे डिचोली-कुडचिरे रस्त्यावरील व्हावटी परिसरात रस्त्यावर दरड कोसळली. त्‍यामुळे हा रस्ता सध्या रहदारीसाठी असुरक्षित आणि धोकादायक बनला आहे.
Kudchire Landslide
Kudchire LandslideDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: जोरदार पावसामुळे डिचोली-कुडचिरे रस्त्यावरील व्हावटी परिसरात रस्त्यावर दरड कोसळली. त्‍यामुळे हा रस्ता सध्या रहदारीसाठी असुरक्षित आणि धोकादायक बनला आहे.

गेल्या तीन दिवसांपासून पडणाऱ्या जोरदार पावसामुळे दोन ठिकाणी दरड कोसळल्‍या. रस्त्याच्या बाजूला असलेला जुनाट आणि भव्यदिव्य ‘सातिंगण’ हा देवाचा वृक्ष कोसळण्याचा धोका आहे.

तशी भीतीही स्थानिक व्यक्त करत आहेत. वाठादेवमार्गे डिचोलीहून कुडचिरेला जाताना उजव्या बाजूने रस्त्यावर दरड कोसळली आहे. कारापूर-सर्वण आणि वन-म्हावळिंगे पंचायतींच्या सीमेवर व्हावटी परिसरात दरड कोसळण्याचा हा प्रकार घडला आहे.

Kudchire Landslide
Goa Rain: पावसाचा जोर वाढणार? 2 दिवस ऑरेंज अलर्ट जारी; प्रशासन सतर्क

आधीच व्हावटी परिसरात अरुंद असलेला हा रस्ता रहदारीस धोकादायक बनला आहे. वेळीच उपाययोजना केली नाही तर अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही दरड सीमेवर दोन पंचायतींच्या क्षेत्रात कोसळल्याने उपाययोजनेसंबंधी प्रश्‍‍नचिन्‍ह निर्माण झाले आहे.

Kudchire Landslide
Goa Rain Update: गोव्यात पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून ‘यलो अलर्ट’

भला मोठा वृक्षही कोसळण्‍याचा धोका

व्हावटी परिसरात ज्या ठिकाणी दरडी कोसळत आहेत, त्या ठिकाणी रस्ता वळणदार आणि अरुंद आहे. तेथेच रस्त्याच्या कडेला सुमारे दोनशे वर्षांचा भलामोठा जुनाट वृक्ष आहे. दरड आणखी कोसळली तर हा वृक्ष उन्मळून रस्त्यावर पडण्याचा धोका आहे. दुर्दैवाने तशी घटना घडली, तर मोठी आपत्ती ओढवण्याची शक्यता आहे, अशी भीती रत्नाकर गोवेकर आणि अन्‍य नागरिकांनी व्‍यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com