VIDEO: "रस्ता नाही, तर मतदान नाही"! गोव्यातील 'या' गावच्या ग्रामस्थांचा इशारा; निवडणुकांवर बहिष्‍कार टाकण्‍याचा निर्धार

Bicholim Katarwada: आयडीसी-डिचोली परिसरातील कातरवाडा येथील दुर्लक्षित रस्त्याच्या प्रश्‍‍नावर आता स्थानिक लोक एकवटले आहेत. महिलांसह युवकही आक्रमक झाले आहेत.
Bicholim katarwada
Bicholim katarwadaDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: आयडीसी-डिचोली परिसरातील कातरवाडा येथील दुर्लक्षित रस्त्याच्या प्रश्‍‍नावर आता स्थानिक लोक एकवटले आहेत. महिलांसह युवकही आक्रमक झाले आहेत. ‘‘जोपर्यंत रस्ता होत नाही, तोपर्यंत पालिकाच नव्हे तर कोणत्याही निवडणुकीसाठी मतदान करणार नाही’’ असा इशारा त्यांनी दिला आहे.

कातरवाड्यावरील रस्त्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. पक्का रस्ता नसल्यामुळे स्थानिकांना दैनंदिन जीवनात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय.

वाड्याला जोडणारा सुमारे एक किलोमीटरचा मातीचा रस्ता पूर्णपणे खिळखिळा झाला असून पावसाळ्यात तर परिस्थिती अधिकच बिकट बनते. चिखल, खड्डे आणि पाण्यामुळे नागरिकांना अक्षरशः वाट काढत प्रवास करताना मोठी कसरत करावी लागते.

धड रस्ता नसल्याने ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि शाळकरी मुलांचे हाल होत आहेत. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका पोहोचणेही कठीण होते. त्‍याबद्दल बेगम अन्वर खान आणि अन्य महिलांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

तर, स्थानिक युवक चैतन्य पाटील याने सांगितले की, कातरवाड्याचा रस्त्याचा प्रश्‍‍न तातडीने सोडवला नाही तर पालिका आणि विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात येईल.

Bicholim katarwada
Goa Opinion: गोव्याचा दुसरा मुक्तिलढा जमीन माफियांविरुद्धचा असेल..

पावसाळ्यातील हालअपेष्टा

खड्ड्यांत पाणी साचून चिखलाची दलदल

दुचाकी घसरण्याचे प्रकार; अपघात वाढले

शाळकरी मुलांना चालणे कठीण

रुग्णवाहिकेसाठी मोठा अडथळा

Bicholim katarwada
विकासाचा ढोल मोठा, पण सूर बेसूर; चिंबलपासून तुयेपर्यंत जनअविश्वासाचा वणवा - संपादकीय

मुख्य समस्या कोणत्‍या?

सुमारे एक किलोमीटर अंतराचा मातीचा रस्ता पूर्णतः खराब झाला आहे. पक्का रस्ता नसल्याने दैनंदिन अडचणी वाढत चालल्‍या आहेत. वाड्यावरील शंभरहून अधिक घरांवर त्‍याचा परिणाम होतोय. अनेक वर्षांपासून रस्‍त्‍याची मागणी प्रलंबित असल्‍याने नागरिक तीव्र संताप व्‍यक्त करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com