Bicholim News: डिचोलीत खासगी बसेस बंद राहिल्याने प्रवाशांची गैरसोय

Bicholim News: नाताळ सुट्टीचा परिणाम ः ताटकळत रहावे लागल्याने नाराजी
Bicholim News
Bicholim NewsDainik Gomantak

Bicholim News : विविध मार्गावर धावणाऱ्या बहुतेक खासगी प्रवासी बसगाड्या आज (सोमवारी) बंद राहिल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली.

प्रवासी बसेसअभावी तर डिचोलीत शेकडो प्रवासी अडकून पडले. सकाळी ते दुपारपर्यंत डिचोली बसस्थानकावर तर विविध ठिकाणी जाणारे प्रवासी बसच्या प्रतीक्षेत ताटकळत असल्याचे आढळून आले.

प्राप्त माहितीनुसार नाताळनिमित्त आज सुटी असल्याने आज बहुतेक खासगी प्रवासी बसेस बंद होत्या.

तर काही बसगाड्या लग्नाची भाडी मारण्यात व्यस्त होत्या. असे समजते. परिणामी आज बहूतेक बसगाड्यांनी नियोजित मार्गावर वाहतूक करण्याचे टाळले.

नियोजित मार्गावरील वाहतूक सेवा बंद ठेवणाऱ्या प्रवासी बसगाड्यां विरोधात वाहतूक खात्याने कारवाई करावी. अशी मागणी अडकून पडलेल्या संतप्त प्रवाशांनी केली आहे.

Bicholim News
Goa Crime: आई आणि मुलीचा विनयभंग करणाऱ्या म्हापशातील दोघा जणांना अटक

बहूतेक खासगी प्रवासी बसगाड्या बंद राहिल्याने इच्छित स्थळी जाण्यासाठी बाहेर पडलेल्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.

बहुतेक प्रवासी अडकून पडले. ''कदंब''च्या आणि मोजक्याच खासगी प्रवासी बसगाड्या आज धावताना दिसून येत होत्या. बऱ्याच वेळानंतर एखादी बसगाडी बसस्थानकावर येत होती. बसगाडी येताच बसमध्ये चढण्यासाठी गर्दी होत होती.

प्रवाशांची रिक्षा; पायलटवर भिस्त

बसगाड्यांअभावी काही प्रवाशांना लग्न समारंभ आदी महत्वाच्या ठिकाणी वेळेवर पोचणे शक्य झाले नाही. या गैरसोयीमुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.

बहुतेक बसेस बंद राहिल्याने माझ्यासह अनेक प्रवासी अडकून पडले, असे वाठादेव येथील एक प्रवासी मनोहर मांद्रेकर यांनी सांगितले. बसगाड्या बंद राहिल्याने काही प्रवाशांनी तर भाड्याची मोटारसायकल तसेच रिक्षा करून इच्छित स्थळ गाठले. त्यामुळे त्यांना अधिक पैसेही मोजावे लागले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com