Bicholim House : डिचोली तालुक्यात घरे शाकारणी सुरू; कामांची लगबग

Bicholim House : बाजारात प्लास्टिकला मागणी वाढली
Bicholim House
Bicholim HouseDainik Gomantak
Published on
Updated on

Bicholim House :

डिचोली, मॉन्सून दाखल झाला तरीही डिचोलीतील ग्रामीण भागात पावसाळापूर्व कामे पूर्ण झाली नसल्याचे आढळून येत आहे अजूनही काही भागात घरे शाकारणी आदी पावसाळापूर्व कामांची लगबग सुरू असल्याचे दिसून येत आहे.

दुसऱ्या बाजूने अजूनही बाजारात प्लास्टिक, पत्रे आदी साहित्याला मागणी असल्याचे दिसून येत आहे.

दरवर्षी पावसाळ्याची चाहूल लागली, की बहुतेकजण घरे शाकारणी, प्लॅस्टिकची आच्छादने टाकणे आदी कामांना हात घालतात. काहीजण पावसाळा सुरू होण्यापूर्वी ही कामे आटोपूनही घेतात. यंदा मात्र काही भागात अजूनही ही कामे ''जैसे थे'' असल्याचे दिसून येत आहे. एका बाजूने अवकाळी पावसामुळे ही कामे वेळेत पूर्ण करण्यात करण्यात अडचण निर्माण झाली आहे. तर दुसऱ्या बाजूने मजुरांची कमतरता. कामांसाठी मजूरही भाव खाऊ लागले आहेत.

Bicholim House
Goa Todays Update News: कळंगुट पोलिसांची छापेमारी, 46,000 च्या हेरॉईनसह एकाला अटक

मजुरांची कमतरता

घरे शाकारणी आणि अन्य पावसाळापूर्व कामे करण्यासाठी तरबेज मजुरांची गरज भासत असते. बहुतेक भागात मजुरांच्या मदतीनेच घरे आणि गोठे शाकारणीची कामे करण्यात येत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com